Breaking : इंग्लंडच्या कर्णधाराने केली क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी यष्टिरक्षक सारा टेलर हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सारा टेलर हिने वयाच्या 17व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

लंडन : महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी यष्टिरक्षक सारा टेलर हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सारा टेलर हिने वयाच्या 17व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

टीम इंडियाचा विचार करत नाही म्हणत गेला इंग्लंडला अन् फ्लॉप झाला

आतापर्यंत तिने 226 सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तिने एकूण 6,333 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणारी ती इंग्लंडची दुसरी क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर तिने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये यष्टिमागे एकूण 232 बळी मिळविले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे तिने वारंवार क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarah Taylor Announces Her Retirement From International Cricket