World Cup 2019 : सर्फराजचे मामाही म्हणतात; भारतच जिंकावा

वृत्तसंस्था
रविवार, 16 जून 2019

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचे मामा महमूद हसन यांनी भारत-पाक सामन्यापूर्वी भारतानेच हा सामना जिंकावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, आजच्या सामन्यात सर्फराज चांगला खेळवा म्हणजे त्याचे कर्णधारपद अबाधित राहिल असेही ते म्हणाले आहेत. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचे मामा महमूद हसन यांनी भारत-पाक सामन्यापूर्वी भारतानेच हा सामना जिंकावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, आजच्या सामन्यात सर्फराज चांगला खेळवा म्हणजे त्याचे कर्णधारपद अबाधित राहिल असेही ते म्हणाले आहेत. 

सर्फराजचे मामा असले तरी महमूद उत्तर प्रदेशच्या इटावा येथे राहतात. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. ते भारताच्या विजयसाठी उत्सुक आहेत मात्र, त्यांचा भाचा सर्फराजही चांगला खेळायला हवा अशी भावना व्यक्त केली आहे. 

''भारतीय संघातील सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत आणि आमचा संघ सर्वोत्तम आहे. भारतीय संघ या सामन्यात विजयी व्हावा अशीच माझी इच्छा आहे. पण माझ्या भाच्यानेही चांगली कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे कारण तरच त्याच्याकडे पाकिस्तानच्या संघाची नेतृत्व धूरा त्याच्याकडे राहिल,'' असे मत महमूद यांनी व्यक्त केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarfaraz ahmeds uncle says India should win this game