Indonesia Open 2025 : सात्विक-चिराग शेट्टी जोडीचे आव्हान संपुष्टात; इंडोनेशिया स्पर्धेत भारतीयांची निराशा

Satwik Chirag : इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेत भारताच्या सात्विक-चिराग जोडीचा पराभव झाला. मलेशियाच्या जोडीने सरळ दोन गेममध्ये मात केली. या पराभवामुळे स्पर्धेतील भारतीय जोडीचे आव्हान संपुष्टात आले.
Indonesia Open 2025
Indonesia Open 2025sakal
Updated on: 

जकार्ता : भारताची पुरुष दुहेरीतील अव्वल जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांना इंडोनेशिया ओपन सुपर १००० या स्पर्धेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मलेशियाच्या मॅन वेई चोंग-ती काई वुन या जोडीने भारताच्या जोडीवर सरळ दोन गेममध्ये मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या पराभवासह भारतीय खेळाडूंचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com