पहिला गेम ११-२१ ने गमावला अन् मग भारतीय जोडीने सगळा खेळच फिरवला! सात्त्विक-चिरागचा चीनवर दणदणीत विजय, चायना मास्टर्समध्ये रचला इतिहास

Satwik Chirag China Masters 2026: सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी चायना मास्टर्स सुपर ७५०च्या पुरुष दुहेरीत ऐतिहासिक जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात ११-२१, २१-१३, २१-१७ असा विजय मिळवत या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी भारताची पहिली जोडी ठरली.
Satwik Chirag China Masters 2026

Satwik Chirag China Masters 2026

esakal

Updated on

शेनझेन (चीन) : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय जोडीने रविवारी इतिहास रचला. सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी जोडीने अंतिम फेरीच्या लढतीत ही जी टिंग व रेन झियांग यू या जोडीवर तीन गेममध्ये रोमहर्षक विजय मिळवला आणि चायना मास्टर्स सुपर ७५० या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीत विजेतेपदावर मोहर उमटवली. या स्पर्धेमध्ये जेतेपद पटकावणारी सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी ही भारताची पहिलीच जोडी ठरली, हे विशेष.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com