
Badminton News: मलेशिया सुपर बॅडमिंटन स्पर्धेतील भारताच्या सात्विक आणि चिराग शेट्टी यांची शानदार वाटचाल अखेर उपांत्य फेरीत संपुष्टात आली. कोरियाच्या किम वोन हो आण सेऊ सेउंग जे यांच्याविरुद्ध त्यांना सरळ गेममध्ये पराभव सहन करावा लागला.
या स्पर्धेत सातवे मानांकन असलेल्या सात्विक आणि चिराग यांनी गतवर्षी अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. आज उपांत्य सामन्यात मात्र त्यांचा ४० मिनिटांत १०-२१, १५-२१ असा पराभव झाला.