Student Athletes sakal
क्रीडा
Student Athletes : खेळाडूंचे कुपोषण, दीडशे रुपयांमध्ये करा जेवण; शालेय क्रीडा स्पर्धेसाठी तुटपुंजा निधी
Maharashtra Sports : राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांसाठी मिळणारा १५० रुपयांचा भोजन भत्ता ११ वर्षांपासून बदललेला नाही. महागाई वाढली असतानाही खेळाडूंसाठी हा निधी वाढवण्यात आलेला नाही.
अहिल्यानगर : राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाद्वारे खेळाडूंना दररोज १५० रुपये भत्ता भोजनासाठी मिळतो. हा निधी तुटपुंजा आहे. या पैशात खेळाडू सकस भोजन काय करणार, असा सवाल आहे.