Happy Birthday Gautam Gambhir : आफ्रिदी ते इम्रान खान, बघा गंभीरने केली कोणाकोणाची बोलती बंद

See Five Times Former India Opener Gave it Back as he turns 38 today
See Five Times Former India Opener Gave it Back as he turns 38 today

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरकडे कोणाला सुनवायचे म्हटलं की कधीच शब्द कमी पडत नाहीत. मग ते तो क्रिकेट खेळत असताना असो किंवा आता पूर्व दिल्लीतून भाजपचा खासदार झाल्यावर असो. 2008-2011 मध्ये सर्वाधिक फॉर्मात असणाऱ्या फलंदाजांमध्ये गौतम गंभीरची गणना केली जाते. अशा या रोकठोक मते मांडणाऱ्या गौतम गंभारचा आज 38वा वाढदिवस. त्याने पाचवेळा आपल्या रोकठोक वाणीने समोरच्याला कसे शांत केले होते ते आपण पाहूया. 

श्रीलंकेच्या संघाला पाकिस्तानने दिलेल्या सुरक्षेबद्दल- 
नुकतेच श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा त्यांना पंतप्रधानांची सुरक्षा देण्यात आली होती. श्रीलंकेच्या संघाच्या एका बसला सुरक्षा देण्यासाठी पाकिस्तानने जवळपास तीस गाड्याचा ताफा नेमला होता. गंभारने एक व्हिडिओ शेअर करत ''इतना कश्मीर किया के कराची भूल गये,'' अशी खोचक टीका केली होती. 

इम्रान खान : दहशतवाद्यांचे रोल मॉडेल!-
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत दिलेल्या भआषणावर टीका करताना त्याने इम्रान खान यांना दहशतवाद्यांचे रोल मॉडेल अशी उपमा दिली होती. 

काश्मिरमध्ये माणुसकीला थारा नाही पण, 'पाकव्याप्त काश्मिरमध्ये'-
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याने काश्मिरमधील लोकांना संयुक्त राष्ट्राने सांगितल्याप्रमाणे हक्क दिले जावेत असे मत व्यक्त केले होते. त्यावर गंभीरने हो काश्मिरमध्ये माणुसकीला थारा नाही हे खरंय. मात्र, ते पाकव्याप्त काश्मिरमध्ये असे सुनावले होते. 

बिशनसिंग बेदी आणि चेतन चौहानांवर थेट टीका-
DDCA चे सदस्य भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी आणि चेतन चौहान यांनी चांगली कामगिरी करुनदेखीलही नवदीप सैनीला दिल्लीच्या रणजी संघात स्थान दिले नव्हते. मात्र, त्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाल्यावर गंभीरने या दोघांवर टीकेची झोड उठविली होती. 

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष केजरीवाल यांच्या खड्डेमुक्त कार्यक्रमावर टीका-
दिल्लीला खड्डेमुक्त करण्याचे काम दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केले आहे, अशा आशयाचे ट्विट केजरीवाल यांनी केल्यावर गंभीरने त्यांच्यावर बाबूजी’ धीरे चलना, बड़े गड्ढे हैं इस राह में! असे ट्विट करत टीका केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com