माझ्यासाठी अखेरचा Commonwealth Game, पण... सीमा पुनियाचे मोठे वक्तव्य | seema poonias big statement last commonwealth game | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

seema poonias big statement last commonwealth game dro95

माझ्यासाठी अखेरचा Commonwealth Game, पण... सीमा पुनियाचे मोठे वक्तव्य

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चार पदकं नावावर असलेल्या भारताच्या सीमा पुनियाला बर्मिंगहॅम येथे पदकाने हुलकावणी दिली. पाचवे राष्ट्रकुल स्पर्धेचे पदक जिंकण्याचे स्वप्न तिचे अपूर्ण राहिले. या पराभवानंतर ३९ वर्षीय सीमाने भावनिक वक्तव्य केले. माझ्यासाठी ही अखेरची राष्ट्रकुल स्पर्धा असल्याचे म्हटले आहे.(seema poonias big statement last commonwealth game )

हरयाणाच्या ३९वर्षीय सीमाने यापूर्वी २००६, २०१४ व २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते, तर २०१०मध्ये तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आशियाई स्पर्धेत तिच्या नावावर २०१४ मध्ये सुवर्ण व २०१८ मध्ये कांस्यपदक आहे. मात्र, पाचवे राष्ट्रकुल स्पर्धेचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला. "ही माझी शेवटची राष्ट्रकुल स्पर्धा असेल पण माझी कारकीर्द अजून संपलेली नाही, मी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये असेन का कुणास ठाऊक." अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच, 'ज्या दिवशी मी प्रशिक्षणात सर्वोत्तम कामगिरी करू शकणार नाही तो माझा शेवटचा दिवस असेल. मी खेळाच्या मागे धावत नसल्यानेच मी आज इथे आहे. असे मत सीमाने यावेळी व्यक्त केले.

यासोबतच, शेवटच्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक गमावण्यात कोणतेही दुःख नाही. कोणतीही मनात खेद नाही. ही माझी पाचवी कॉमनवेल्थ गेम्स होती जी स्वतःच एक मोठी उपलब्धी आहे. यावेळी पदक नसले तरी मी आनंदी आहे. अशी भावाना सीमाने व्यक्त केली.

बर्मिंगहॅम येथे झालेल्या थाळी फेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सीमाने पहिल्या प्रयत्नात ५२.२८ मीटर लांब थाळी फेकली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने ५५.९३ मीटर लांब थाळी फेकून टॉप थ्रीमध्ये एन्ट्री मारली. सीमाचा चौथा प्रयत्न अयशस्वी ठरला. सीमाचा पाचवा प्रयत्नही फेल गेला. सीमाने अखेरच्या प्रयत्नात ५३.८१ मीटर थाळी फेक केली, परंतु तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Web Title: Seema Poonias Big Statement Last Commonwealth Game

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sports