US Open 2019 : सेरेनाची फायनलमध्ये धडक; 'सुपरमॉम' बनणार?

वृत्तसंस्था
Friday, 6 September 2019

अमेरिकेची मातब्बर महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत तिने पाचव्या मानांकित युक्रेनच्या एलिना स्विटोलीनाला 6-3, 6-1 असे हरविले.

न्यूयॉर्क : अमेरिकेची मातब्बर महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत तिने पाचव्या मानांकित युक्रेनच्या एलिना स्विटोलीनाला 6-3, 6-1 असे हरविले.

सेरेनासमोर आता कॅनडाच्या बियांका आंद्रीस्क्‍यू हिचे आव्हान असेल. 15व्या मानांकित बियांकाने 13व्या मानांकित स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्चीचची घोडदौड 7-6 (7-3), 7-5 अशी रोखली.

मायदेशातील या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील ही आगेकूच सेरेनासाठी महत्त्वाची आहे. मार्गारेट कोर्ट यांच्या 24 ग्रॅंड स्लॅम विजेतेपदांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करण्याची तिला आणखी एक संधी मिळाली आहे. सेरेना येत्या 26 सप्टेंबर रोजी 38 वर्षांची होईल. बियांका 19 वर्षांची आहे. सेरेनाला गतवर्षी विंबल्डन आणि अमेरिकन आणि यंदा पुन्हा विंबल्डनला अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. एका मुलीची आई झाल्यानंतर "सुपरमॉम' हे बिरूद सार्थ ठरण्यासाठी तिने जेतेपदच जिंकावे अशी जगभरातील टेनिसप्रेमींची अपेक्षा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serena Williams reaches finals for US Open 2019