Setback for New Zealand | IND vs NZ : न्यूझीलंडला मोठा धक्का; स्टार खेळाडूची T20 मालिकेतून माघार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New-Zealand-Cricket-Team

India vs New Zealand: नियमित कर्णधार केन विल्यमसनही खेळणार नाही टी२० सीरिज

न्यूझीलंडला मोठा धक्का; स्टार खेळाडूची T20 मालिकेतून माघार

IND vs NZ T20 Series : न्यूझीलंडच्या संघाला टी२० विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आता न्यूझीलंडचा संघ १७ नोव्हेंबरपासून ते ७ डिसेंबरपर्यंत भारत दौऱ्यावर असणार आहे. या कालावधीत भारत-न्यूझीलंड यांच्यात ३ टी२० आणि २ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेत त्यांचा नियमित कर्णधार केन विल्यमसन आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यापाठोपाठ आता आणखी एक स्टार खेळाडून मालिकेतून माघारा घेतली आहे.

टी२० मालिकेसाठी भारताने विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या तीन अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. हाच पॅटर्न न्यूझीलंडकडूनही चालवला जात आहे. त्यांनी केन विल्यमसन आणि ट्रेंट बोल्ट या दोघांना विश्रांती दिली आहे आणि टीम सौदी याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. या दोघांच्या पाठोपाठ आता वेगवान गोलंदाज कायल जेमिसन यानेही टी२० मालिकेतून माघार घेतली आहे. कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे त्यानेच स्पष्ट केले आहे.

India and New Zealand

India and New Zealand

"केन विल्यमसन आणि कायल जेमिसन या दोघांशी चर्चा करूनच त्यांना टी२० मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोघांनाही कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करायचे होते. कसोटी मालिकेत खेळणारे अनेक खेळाडू हे टी२० मालिकेत नसतील. खरं पाहता हा संपूर्णत: समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. पाच दिवसात तीन टी२० सामने आणि तेदेखील वेगवेगळ्या शहरांमध्ये ... त्यामुळे खेळाडूंची त्रेधातिरपीट होणं स्वाभाविकच आहे. अशा वेळी खेळाडूंची योग्य ती काळजी घेतली जायला हवी", असे न्यूझीलंडचे मुख्य कोच म्हणाले.

loading image
go to top