
अहिल्यानगर: शालेय स्तरावरून खेळाडूंना योग्य दिशा, सुविधा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसजीएफआय) सातत्याने प्रयत्नात असते. यासाठी अनेक पावलेही उचललेली आहेत, आता असेच विकासाचे पुढचे पाऊल उचलले असून, यात राष्ट्रीय स्तरावर एक समर्पित उपसमितीची स्थापना करणार आहे. या मध्यमातून खेळाडू आणि खेळाच्या विकासासाठी ही समिती मार्गदर्शन करणार आहे.