शफालीच्या प्रक्टिसचा विषयच हार्ड! 150 बाऊन्सर अन् ...

आक्रमक फलंदाज म्हणून ओळखली जाणारी शफाली शॉर्ट पिच चेंडू खेळण्यात कुठेतरी कमी पडतेय असे तिची फलंदाजी पाहाताना वाटायचे.
Shafali Varma
Shafali VarmaFile Photo

भारतीय महिला संघातील 17 वर्षीय शफाली वर्माने (Shafali Verma) अल्पावधीत महिला क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवलाय. आयसीसीच्या महिला टी-20 क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतलेल्या शफाली इंग्लंडमध्ये होणाऱ्या 'द हंड्रेड' आणि ऑस्ट्रेलियातील बीग बॅश लीगसाठीही करारबद्ध झाली आहे. तिचा प्रवास इथेच थांबत नाही तर इंग्लंड दौऱ्यासाठी तिची वनडे आणि कसोटी मालिकेसाठी निवड झाली आहे. (Shafali Verma Practiced 150 bouncer practice in a session batted against mens bowlers of 140 kmph speed)

आक्रमक फलंदाज म्हणून ओळखली जाणारी शफाली शॉर्ट पिच चेंडू खेळण्यात कुठेतरी कमी पडतेय असे तिची फलंदाजी पाहाताना वाटायचे. ही उणीवर भरुन काढण्यासाठी तिने कठोर मेहनत घेतली आहे. एका मुलाखतीमध्ये तिने आपली उणीव भरुन काढण्यासाठी कठोर मेहनतीची कहाणी सांगितली. फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी टेक्निकसह प्रॅक्टिसमध्ये मोठा बदल केल्याचे ती म्हणाली.

टी-20 वर्ल्ड कपनंतर बॅटिंगवर विशेष भर देण्यास सुरुवात

क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीमध्ये शफाली म्हणाली की, ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 वर्ल्डकप नंतर टेक्निकवर भर देण्यास सुरुवात केली. फिटनेससोबतच स्कील सुधारण्यावर भर देताना नेट्समध्ये कसून सराव केला. सातत्याने 150 बाउंसरचा सामना केला. या प्रक्टिसमध्ये सातत्य राखल्याचेही तिने सांगितले.

हरियाणा पुरुष रणजी टीमच्या कॅम्पमध्ये प्रॅक्टिस

शफाली वर्माने हरियाणा पुरुष टीमसोबत रणजी कँम्पमध्येही सहभाग घेतला. या ठिकाणी प्रॅक्टिस करताना 140 KMPH वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांचा तिने सामना केला. बॅकफूटवर खेळाच्या शैलीत सुधारणा करण्यासाठी हा काळ फायदेशीर ठरला, असे शफालीने म्हटले आहे. याच्याशिवाय तिने नवोदित गोलंदाज हर्षल पटेल आणि मोहित शर्मा यांच्यासह अष्टपैलू राहुत तेवातियाकडून शॉर्ट पिच बॉलिंगवर खेळण्याच्या टिप्सही घेतल्या.

कोरोनाच्या संकट काळात कोच अश्विन कुमार यांनी केली मदत

कोरोनाच्या संकटात प्रॅक्टिस करणे खूप कठिण झाले होते. यावेळी कोच अश्विन कुमार यांनी खूप मदत केली, असे शफालीने म्हटले आहे. हरियाणाकडून फस्ट क्लास क्रिकेट खेळलेले माजी क्रिकेटर आणि विद्यमान कोच अश्विन कुमार यांनी शफालीसाठी नेट्स आणि बॉलिंग मशीनची सोय करुन दिली. इंग्लंड दौऱ्यापूर्वी प्रॅक्टिसमधील मोठा अडथळा यामुळे दूर झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com