Shafali Verma : W, W, W... शफाली वर्माचा शेवटच्या षटकात धमाका, फक्त 95 धावा करूनही भारत जिंकला

Shafali Verma INDW vs BANW
Shafali Verma INDW vs BANWesakal

Shafali Verma INDW vs BANW : बांगलादेश महिला संघाविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने 8 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला 20 षटकात 95 धावात रोखले होते. मात्र भारतीय संघाने बांगलादेशचा 87 धावात खुर्दा उडवला. भारताकडून शफाली वर्माने शेवटच्या षटकात 3 विकेट्स घेतल्या. तिला दिप्ती शर्माने 12 धावात 3 विकेट्स घेत चांगली साथ दिली. (India Women's Cricket News)

भारताची सलामीवीर शेफाली वर्माने बागंलादेश विरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात 19 धावा केल्या. मात्र फलंदाजीतील कसर तिने गोलंदाजीत भरून काढली. बांगलादेशला शेवटच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज होती. मात्र शफाली वर्माने अवघ्या 1 धावात तीन विकेट्स घेत भारताला 8 धावांनी विजय मिळवून दिला. (Women's T20 Cricket News)

Shafali Verma INDW vs BANW
Lord Hanuman Mascot : थायलंडमध्ये होणाऱ्या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी हनुमान अधिकृत शुभंकर

बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारतावरच उलटला. भारताच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या पाच षटकातच 33 धावांपर्यंत मजल मारून दिली होती.

शफाली वर्मा आक्रमक फलंदाजी करत होती तर मानधनाने सावध पवित्रा घेतला होता. मात्र नाहिदा अख्तरने मानधनाला 13 धावांवर बाद केले. त्यानंतर शफाली देखील 14 चेंडूत 19 धावा करून बाद झाली.

Shafali Verma INDW vs BANW
Wi vs Ind 1st Test : चेतेश्वर पुजारा अन् मोहम्मद शमीच्या जागी कोण खेळणार? उपकर्णधारने दिले संकेत

भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर आलेल्या भारताच्या मधल्या फळीला सुल्ताना खातूनने जबर धक्के दिले. तिने भारताची अवस्था 5 बाद 58 धावा अशी केली. यानंतर फातिमा खातूनने देखील दोन विकेट्स घेत तिला चांगली साथ दिली. भारताच्या दिप्ती शर्मा (10) आणि अमरजोत कौरने (14) डाव सावरला. अखेर भारताने 20 षटकात 8 बाद 95 धावांपर्यंत मजल मारली.

भारताचे 96 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशची कर्णधार निराग सुल्तानालाचा अपवाद वगळला तर इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तिने 55 चेंडूत 38 धावा करत एकाकी झुंज दिली.

मात्र 19 व्या षटकात बांगलादेशच्या 5 बाद 86 धावा झाल्या असताना दिप्ती शर्माने सुल्तानाला 38 धावांवर बाद करत बांगलादेशला मोठा धक्का दिला. यानंतर शेवटच्या षटकात शफाली वर्माने अवघी 1 धाव देत तीन बळी टिपले. बांगलादेशचा संघ 87 धावात ऑलआऊट झाला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com