
इन्शा अल्लाह! दोन आफ्रिदी एकत्र प्रार्थना करतात तेव्हा...
कराची : पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आपल्या खेळामुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. अशा परिस्थितीत शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटर आणि त्याचा होणार सासरा शाहिद आफ्रिदीसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. शाहीन आफ्रिदीने शाहिद आफ्रिदीसोबत इफ्तारी साजरी केली आणि त्याचा फोटो शेअर केला. लालासोबत इफ्तारी असे शाहीनने फोटोला कॅप्शन दिले आहे.
शाहीन शाह आफ्रिदी सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. शाहिद आफ्रिदीने गेल्या वर्षी मोठ्या मुलीचे शाहीन आफ्रिदीशी लग्न करणार असल्याचे जाहीर केले आहे. दोघांची एंगेजमेंट देखील झाली. शाहीन शाह आफ्रिदी सतत शाहिद आफ्रिदीचे कौतुक करत असतो. माजी पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू देखील अनेक प्रसंगी जावयाची प्रशंसा करत दिसतात.
शाहीन आफ्रिदीही शाहिदप्रमाणे १० नंबरची जर्सी घालते. या आधी ही जर्सी फक्त शाहिद आफ्रिदीच्या नावावर होती पण नंतर जेव्हा शाहीनने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे अपील केले तेव्हा शाहिदच्या सांगण्यावरून त्याला हा नंबर देण्यात आला. शाहीन आफ्रिदी विकेट घेतल्यानंतरही सासरच्यांप्रमाणे सेलिब्रेशन करत असतो.
Web Title: Shaheen Shah Afridi Shahid Afridi Iftari Pakistan Ramadan Instagram Sports Cricket News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..