आफ्रिदी म्हणतो, विराट तू खूप मोठा खेळाडू, असेच खेळत राहा

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

भारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात तुफान फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळावर अनेकजण फिदा झाले त्यांच्यातच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीचाही नंबर लागतो. कोहलीच्या कालच्या खेळीनंतर तोही कोहलीचा चाहता झाला आहे. त्याने कोहलीचे तोंडभरुन कौतुक केले आहे. 

मोहाली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात तुफान फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळावर अनेकजण फिदा झाले त्यांच्यातच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीचाही नंबर लागतो. कोहलीच्या कालच्या खेळीनंतर तोही कोहलीचा चाहता झाला आहे. त्याने कोहलीचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

चाहत्यांना पटले नाही तरी लवकरच स्मिथ पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार!

''अभिनंदन विराट, तू एक मोठा खेळाडू आहेस. अशीच कामगिरी करत राहण्यासाठी शुभेच्छा. आशा आहे की यापुढेही जगभरातील चाहत्यांचे मनोरंजन करत राहशील,'' अशा शब्दांत आफ्रिदीने कोहलीचे कौतुक केले आहे. 

कोहलीने कालच्या सामन्यात केलेल्या खेळीसह अनेक विक्रम मोडले. त्याने शाहीद आफ्रिदीच्या ट्वेंटी20 क्रिकेटमधील सर्वाधिक सामनावीराच्या पुरस्काराशीही बरोबरी केली. 

INDvsSA : पंतची लायकी स्थानिक क्रिकेट खेळण्याचीच

कोहलीने काल ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 11व्यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकाविला. आफ्रिदीनेसुद्ध 11 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकाविला आहे. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातही जर कोहलीने सामनावीर होण्याचा मान मिळवला तर तो आफ्रिदीचा विक्रम मोडेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahid Afridi Hails Virat Kohli For His Performance