मेलबर्नवरील श्रंद्धाजली कार्यक्रम; शेन वॉर्नच्या आठवणीत लेक ढसाढसा रडली! Shane Warne State Memorial Service | Melbourne Cricket Ground | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shane Warne State Memorial Service

मेलबर्नवरील श्रंद्धाजली कार्यक्रम; शेन वॉर्नच्या आठवणीत लेक ढसाढसा रडली!

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne )याला मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानात अखेरची श्रद्धांजली वाहण्यात आली. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळींसह क्रिकेट चाहतेही मोठ्या संख्येनं त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मेलबर्न स्टेडियमवर (Melbourne Cricket Ground) आल्याचे पाहायला मिळाले. ब्रायन लारा, मार्क टेलर, एलन बॉर्डर, मर्व्ह ह्यूज, नासिर हुसेन यांच्या पॅनलचे एक चर्चा सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही व्हिडिओच्या माध्यमातून वॉर्नला श्रद्धांजली वाहिली. केवळ क्रिकेटरच नव्हे तर हॉलिवूड स्टारही या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. (shane warne state memorial service melbourne cricket ground daughter rajasthan royals australia)

हेही वाचा: जेव्हा शेन वॉर्न ने रविद्र जडेजाला बसमधून उतरायला सांगितले; वाचा किस्सा

राजकीय कार्यक्रमात वडीलांच्या आठवणीने मुलगी समर जॅक्सन भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. व्यासपीठावर बोलताना तिला अश्रू अनावर झाले. ब्रुक म्हणाली की, 26 दिवसांपूर्वी तुम्ही आम्हाला सोडून गेलात. तुमच्यावरील प्रेम मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. ब्रुक, जॅकसन आणि समर या शेन वार्नची तिन्ही मुले या कार्यक्रमात भावूक झाली होती. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये वॉर्नला श्रद्धांजली देण्यासाठी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसही उपस्थितीत होते. विक्टोरिया राज्य सरकार आणि ऑस्ट्रेलियन सरकारच्या माध्यमातून शेन वॉर्नला राजकीय सन्मानात श्रद्धांजली देण्यात आली.

हेही वाचा: VIDEO : 90 अंशात वळवलेल्या त्या बॉलनं शेन वॉर्न महान झाला!

याआधी क्रिकेट जगतात आपल्या फिरकीची जादू दाखवून देणाऱ्या शेन वॉर्नला (Shane Warn) मेलबर्न येथील St Kilda Football Club च्या मैदानातून अखेरचा निरोप देण्यात आला होता. या महिन्यात म्हणजे 4 मार्च 2022 रोजी थायलंडमधील एका व्हिलामध्ये शेन वॉर्नला ह्रदय विकाराचा झटका आला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याठिकाणी कोणतेही उपचार करण्यापूर्वीत त्याला मृत घोषीत करण्यात आले होते. वॉर्नची तीन मुले ब्रुक 24, जॅक्सन 22 आणि 20 वर्षीय समर यांच्यासह वॉर्नचे आई वडील अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थितीत होते.

Web Title: Shane Warne State Memorial Service Melbourne Cricket Ground Daughter Rajasthan Royals Australia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top