फिरकीच्या जादुगाराचा फलंदाजीत आहे विश्वविक्रम; माहितीय का?

Shane Warne
Shane Warne
Summary

गोलंदाजीतली त्याची कमाल तर जगाला माहिती आहे. पण याच वॉर्नच्या नावावर फलंदाजीतलासुद्धा एक विश्वविक्रम आहे.

ऑस्ट्रेलिया महान फिरकीपट्टू शेन वॉर्नचं (Shane Warne) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्याच्या निधनाने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या फिरकीच्या जोरावर मैदानात फलंदाजांना नाचवणाऱ्या शेन वॉर्नने गोलंदाजीत अनेक विक्रम नावावर नोंदवले. सर्वाधिक बळी घेणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वॉर्नने सर्वात आधी ७०० बळींचा टप्पा गाठला होता. गोलंदाजीतली त्याची कमाल तर जगाला माहिती आहे. पण याच वॉर्नच्या नावावर फलंदाजीतलासुद्धा एक विश्वविक्रम आहे. (Shane Warne World Record In batting)

कसोटी क्रिकेटमध्ये शेन वॉर्नने ३ हजार १५४ धावा केल्या होत्या. या धावा त्यानं एकही शतक न करता केल्या होत्या. तर १२ अर्धशतकांचा यामध्ये समावेश होता. कसोटीत तो एकदा नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला होता. २००१ मध्ये वॉर्न न्यूझिलंडविरुद्ध पर्थ कसोटीत ९९ धावांवर बाद झाला होता. हीच त्याची कसोटीत एका डावातील सर्वोच्च धावसंख्या होती.

कसोटीत एकही शतक न करता ३ हजारांहून जास्त धावा करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे. दोनवेळा त्याला शतकाच्या जवळ जाऊनही शतक साजरं करता आलं नव्हतं. कसोटीत ३१५४ धावा करणाऱ्या वॉर्नने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०१८ धावा केल्या होत्या. कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात प्रत्येकी १ हजारांपेक्षा जास्त धावा आणि २०० पेक्षा जास्त बळी घेणाऱ्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये शेन वॉर्नचा समावेश आहे.

Shane Warne
Shane Warne: खेळाडू म्हणून 'ग्रेट' होताच पण माणूस म्हणूनही मोठाच!

शेन वॉर्नने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत १४५ कसोटी ७०८ विकेट घेतल्या तर १९४ एकदिवसीय सामन्यात २९३ विकेट घेतल्या होत्या. १९९३ मध्ये त्यानं अॅशेस कसोटीत पहिल्याच चेंडूवर कमाल केली होती. ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात त्यानं चेंडू असा वळवला की आजही त्याला बॉल ऑफ सेंच्यरी असं म्हटलं जातं. त्याच मालिकेत वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com