मेलबर्नमध्ये शेन वॉर्नच्या पुतळ्याला बिअर अन् सिगारेट वाहून श्रद्धांजली

Shane Warne
Shane WarneSakal

मेलबर्न : क्रिकेटच्या मैदानातील महान फिरकीपटू शेन वॉर्नला (Shane Warne) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड परिसरात सम्मानपूर्वक निरोप देण्याची तयारी सुरु आहे. शेन वॉर्नच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला एक लाखाहून अधिक लोक जमा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येतीये. सार्वजनिक शोकसभा कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे समजते. वॉर्नचा मॅनेजर जेम्स एर्सकिने किंवा क्रिकेट बोर्डाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. (Shane Warne's state funeral service to be held at iconic Melbourne Cricket Ground 1 lakh people likely to attend sbj86)

‘हेराल्ड सन'च्या वृत्तानुसार, शेन वॉर्नची अंत्यसंस्काराचा सोहळा दोन ते तीन आठवड्यात होईल. एमसीजीवर याची तयारी सुरु आहे. वॉर्नचे कुटुंबिय थायलंडवरुन पार्थिव येण्याची प्रतिक्षा करत आहे. 'द ऐज'च्या वृत्तानुसार, पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि विक्टोरियाचे प्रमुख डॅनियल अँड्रयूज देखील अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासासंदर्भात त्यांनी वॉर्नच्या कुटुंबियांशी संपर्कही केला आहे.

Shane Warne
PAK vs AUS : खेळपट्टीवर जाफरची तिखट प्रतिक्रिया; म्हणाला...

एमसीजी वॉर्नचे आवडते मैदानात होते. 1994 मध्ये याच मैदानात इंग्लंड विरुद्धत्याने हॅटट्रिकची कमाल केली होती. एमसीजीच्या मैदानाबाहेर वॉर्नचा एक पुतळाही उभारण्यात आला आहे. त्याच्या निधनानंतर आता चाहते याठिकाणी येऊन श्रद्धांजली वाहत आहेत. काही चाहते पुतळ्याजवळ पुष्प वाहून त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. तर काही लोक सिगारेट आणि बिअरच्या बॉटल्स ठेवून वॉर्नच्या आठवणी जाग्या करत आहेत. वॉर्नचे निधन झाले त्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचे माजी विकेट किपर रॉडनी मार्श यांचेही निधन झाले होते. वेस्टर्न आस्ट्रेलिया सरकारने त्यांच्यावरील अंत्यसस्कारही शासकीय इंतमामात करण्याचा निर्णय घेतला होता.

Shane Warne
तुझ्या मनाप्रमाणे नाही चालणार; BCCI नं पांड्याला दाखवली जागा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com