Sa vs Ind 2nd Test | केपटाऊन कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! अष्टपैलू खेळाडूला झाली गंभीर दुखापत

Shardul Thakur Injured News | भारतीय क्रिकेट संघाला शनिवारी मोठा धक्का
Shardul Thakur Injured News
Shardul Thakur Injured News

Shardul Thakur Injured : भारतीय क्रिकेट संघाला शनिवारी मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला नेटमध्ये फलंदाजी करताना खांद्याला दुखापत झाली.

केपटाऊनमध्ये 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही, अशी शक्यता आहे. पण आवश्यक असल्यास त्याच्या दुखापतीची तीव्रता स्कॅनद्वारे ठरवली जाईल. त्याच्या दुखापतीसाठी स्कॅनची गरज आहे की नाही हे सध्या निश्चित नाही. पण ठाकूरला खूप त्रास होत होता आणि नेट सेशनमध्ये गोलंदाजीही करता आली नाही.

Shardul Thakur Injured News
Year Ender 2023 : ब्रिजभूषणवर लैंगिक शोषणाचा आरोप ते मॅथ्यूजच्या टाइम आउटपर्यंत! क्रीडा जगताला हादरवून सोडणारे मोठे वाद जे गाजले

आज थ्रो डाउन नेटवर सराव करणार ठाकूर हा पहिला खेळाडू होता. पण सत्र सुरू झाल्यानंतर 15 मिनिटात त्यांच्या खांद्यावर चेंडू लागला. फिजिओने त्याच्या खांद्यावर बर्फाचा पॅक लावला पण त्यानंतर तो पुन्हा नेटमध्ये सराव करायला गेला नाही. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ठाकूरला शॉर्ट बॉलचा बचाव करता आला नाही. चेंडू लागताच तो वेदनेने दिसला.

ही दुखापत किरकोळ असू शकते, परंतु ही दुखापत किती लवकर बरी होते हे पाहणे बाकी आहे. पहिल्या कसोटीत तो प्लेइंग-11 चा भाग होता. ठाकूरने पहिल्या कसोटीत अवघ्या 19 षटकांत 100 हून अधिक धावा दिल्या होत्या आणि फलंदाजीतही त्याची कामगिरी चांगली नव्हती.

दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पिछाडीवर आहे. पहिल्या कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला होता. आता दोन्ही संघ केपटाऊन येथे 3 ते 7 जानेवारी दरम्यान नवीन वर्षाची कसोटी खेळतील.

हा सामना जिंकून रोहित शर्माच्या सेनेला मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवायची आहे. मात्र, आजपर्यंत भारताने केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. 6 सामन्यांपैकी 4 हरले आहेत, तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com