esakal | Test Rankings: शार्दूलची गरूडझेप, बुमराहलाही बढती; अश्विनची मात्र घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul Thakur

Test Rankings: शार्दूलची गरूडझेप, बुमराहला बढती; अश्विनची घसरण

sakal_logo
By
विराज भागवत

पाहा Top 10 मध्ये कोणाचा लागला नंबर

ICC Men's Test Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतीच ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत हिरो ठरलेल्या शार्दूल ठाकूरला या क्रमवारीत मोठी उडी घेता आली. शार्दूलने दोन्ही डावात ठोकलेल्या अर्धशतकांच्या जोरावर फलंदाजांच्या यादीत ५९ स्थानांची गरूडझेप घेत ७९वे स्थान पटकावले. त्याशिवाय, गोलंदाजीतील दमदार प्रदर्शनासाठी त्याला सात स्थानांची बढती मिळाली असून तो ४९व्या स्थानी विराजमान झाला. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही त्याने टॉप २०मध्ये जागा मिळवली.

शार्दूल व्यतिरिक्त, भारताकडून दमदार गोलंदाजी करणारा जसप्रीत बुमराह याला एका स्थानाची बढती मिळून तो ९व्या स्थानी विसावला आहे. फलंदाजांच्या यादीत रोहित ५व्या आणि विराट ६व्या स्थानी कायम आहेत. फक्त रोहित आणि विराट यांच्या गुणांमधील फरक आधी ७ रेटिंग पॉइंट्स इतका होता, तो आता चौथ्या कसोटीनंतर ३० रेटिंग पॉईंट्स इतका वाढला आहे. भारतीय संघाने सामना जिंकल्यामुळे सर्व भारतीय खुश असले तरी भारताचा अनुभवी रविचंद्रन अश्विन याची मात्र क्रमावारीत घसरण झाली.

रविचंद्रन अश्विन याला कसोटी मालिका सुरू झाल्यापासून संधी देण्यात आलेली नाही. चारही सामन्यात त्याला संघाबाहेर बसावे लागले. त्याचा अश्विनच्या गोलंदाजीच्या क्रमवारीवर परिणाम झालेला नसला तरी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत फटका बसला आहे. त्याची एका स्थानाने घसरण झाल्याने तो Top 5च्या काठावर पोहोचला आहे. इंग्लंडचा ख्रिस वोक्स याने मात्र एक अर्धशतक आणि महत्त्वाचे बळी टिपत Top 10 मध्ये प्रवेश केला आहे.

loading image
go to top