Sports News: आपल्या मर्यादा इतरांना ठरवू देऊ नका,स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा!; दोन्ही हात नसलेल्या पॅरा तिरंदाज शीतल देवीचा मंत्र

Sheetal Devi: Para Archery World Champion: दोन्ही हात नसलेल्या १९ वर्षीय शीतल देवीने पॅरा तिरंदाजीमध्ये जागतिक विजेतेपद जिंकले आहे. नियम बदल आणि कठीण प्रशिक्षणातून मार्ग काढत, तिने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला.
Sports News

Sports News

esakal

Updated on

नवी दिल्ली: स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा, इतरांना आपल्या मर्यादा ठरवू देऊ नका, असा मंत्र दोन्ही हात नसलेल्या आणि पॅरा तिरंदाजीत जगात अव्वल असलेल्या १९ वर्षीय शीतल देवी हिने व्यक्त केला आहे. २०२५ हे वर्ष आपल्यासाठी पीछेहाट होणारे, त्याग करणारे आणि कठोर मेहनत घेऊन पुन्हा भरारी घेणारे ठरले, असे ती म्हणाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com