esakal | शिखर धवनचा 9 वर्षांनी घटस्फोट? पत्नीची पोस्ट होतेय व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

shikhar dhawan and aesha mukerji

शिखर धवनचा 9 वर्षांनी घटस्फोट? पत्नीची पोस्ट होतेय व्हायरल

sakal_logo
By
सुशांत जाधव

शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Aesha Mukerji) यांच्या गोडी गुलाबीनं सुरु असलेल्या संसारात मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली आहे. धवनची पत्नी आयेशा हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे धवनच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आले आहे. आऐशानं एक भावूक पोस्ट लिहिली आहे. यात तिने 'तलाक'संदर्भातील गोष्टींचा उल्लेख केला आहे. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

शिखर धवन आणि आऐशा मुखर्जी 9 वर्षांपासून एकमेकांसोबत गुण्यागोविंदानं संसार करत आहेत. 2012 मध्ये दोघांनी विवाह केला. धवन आणि आऐशा यांना एक मुलगा देखील आहे. आऐशा धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी असून तिचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या लग्नानंतर आऐशा दोन मुलींची आई होती. दोन मुलींच्या आईसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही धवन चांगलाच चर्चेत आला होता. शिखर धवनच्या आईने धवनची साथ देत त्याचा आऐशासोबत विवाह पार पाडला होता. 2014 मध्ये आऐशाने झोरावर नावाच्या मुलाला जन्म दिला.

2020 मध्येही या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा रंगली होती. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. एवढेच नाही तर आऐशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शिखर धवनचे सर्व फोटोही डिलिट केले होते. दुसऱ्या बाजूला धवनने मात्र अशी कोणतीही गोष्ट केली नव्हती. आयेशाचा पहिला विवाह हा ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाशी झाला होता. या दोघांना दोन मुली होत्या. 2000 मध्ये तिने आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव आलिया आहे. 2005 मध्ये तिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. तिचे नाव रिया असे आहे. आऐशा आणि धवन यांची प्रेम कहाणी फेसबुकच्या माध्यमातून सुरु झाली. हरभजन सिंगने या दोघांच्यामध्ये मध्यस्थी केली होती. फेसबूकवरील चॅटिंगनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले. त्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

loading image
go to top