INDvsWI : शिखर धवन एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar Dhawan Set To Be Ruled Out Of West Indies ODIs

संघातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याने यापूर्वीच कसोटी संघातील स्थान गमावले आहे. गेलेला फॉर्म आणि आता झालेली दुखापत यामुळे त्याचे मर्यादित क्रिकेटमधील स्थानही धोक्यात येऊ शकते. 

INDvsWI : शिखर धवन एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर 

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर शिखर धवनया चे नशीब काही बदलण्याचे नाव घेत नाही. तो खराब फॉर्मात असतानाच त्याला सईद मुश्ताक अली स्पर्धेत त्याला दुखापतीने ग्रासले. त्यामुळेच त्याला विंडीजविरुद्ध सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेलाही मुकावे लागले आहे. आता त्याला विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही खेळता येणार नसल्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्राविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्याने स्वत: चार पाच दिवसांत बरे होईल असे सांगितले होते मात्र, त्याची दुखापत बरी होण्यास आणखी काही वेळ लागणार आहे. ट्वेंटी20 मालिकेसाठी त्याच्याजागी आता संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. 

संघातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याने यापूर्वीच कसोटी संघातील स्थान गमावले आहे. गेलेला फॉर्म आणि आता झालेली दुखापत यामुळे त्याचे मर्यादित क्रिकेटमधील स्थानही धोक्यात येऊ शकते. 

आता त्याला विंडीजविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेलाही मुकावे लागण्याची शक्यता आहे. त्याने काही दिवसांपूर्वी जिममधील फोटो शेअर केला होता त्यामुळे त्याच्या पुनरागमनची वेध लागले होते मात्र, त्याचे पुनरागमन अजून लांबणार असल्याचे दिसत आहे.