Shikhar Dhawan : मला न विचारला लग्न कसं ठरवता? धवन पप्पांवर चिडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar Dhawan

Shikhar Dhawan : मला न विचारला लग्न कसं ठरवता? धवन पप्पांवर चिडला

Shikhar Dhawan : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनचा टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला नाही. धवनला यापूर्वीच कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. आता तो फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतोय. भारताच्या ब संघाचे कर्णधारपद आता धवनच्या हाती आले आहे. त्याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते.

हेही वाचा: किस्सा El Clasico चा: मुंबईकर साई मोहनचे शेवटच्या मिनिटाला उघडले नशीब

शिखर धवन खेळाशिवाय सोशल मीडियाच्या रिल्समुळे नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत असतो. पुन्हा एकदा त्याने सोशल मीडियावर मजेशीर रील शेअर केली आहे. यामध्ये तो वडिलांना विचारतो की, त्याला न विचारता त्याचे लग्न का ठरवले. यावर धवनच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्याला न विचारता जन्म दिला. हे ऐकून धवन गप्प बसतो. ''खेल गये पापा'' व्हिडिओ शेअर करत धवनने हे लिहिले आहे.

हेही वाचा: IND vs PAK T20 World Cup : क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी! भारत-पाक सामना होणार रद्द ?

शिखर धवनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व केले आहे. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली. यजमानांनी लखनौमध्ये पहिला सामना नऊ धावांनी गमावला होता. दुसरा सामना सात गडी राखून जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती. त्यानंतर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव करून त्याने मालिका जिंकली.

तिसरा सामना संपल्यानंतर धवनने इंस्टाग्रामवर एक रील शेअर केला ज्यामध्ये तो दलेर मेहंदीच्या "बोलो ता रा रा" गाण्यावर त्याच्या सहकाऱ्यांसोबत नाचताना दिसला होता. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका जिंकल्यानंतरही धवनने संपूर्ण टीमसोबत काला चष्मा या गाण्यावर रिल केली होती.