
लिमा (पेरु) : पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदके पटकावणारी मनू भाकर हिला नेमबाजी विश्वकरंडकात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताची १८ वर्षीय कन्या सुरुची इंदर सिंग हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावताना मनू भाकरला मागे टाकले. या प्रकारात भारतीयांनी दोन पदके पटकावत वर्चस्व गाजवले. चीनच्या याओ कियानशून हिला ब्राँझपदक मिळाले.