Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने भारताचा डावही सावरला अन् 2022 ही गाजवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas Iyer Record Bangladesh Vs India 1st Test

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने भारताचा डावही सावरला अन् 2022 ही गाजवलं

Shreyas Iyer Record Bangladesh Vs India 1st Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांनी दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीलाच भारताची अवस्था 4 बाद 112 धावा अशी केली होती. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने चेतेश्वर पुजारा सोबत पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी भारताचा डाव सावरला. याचबरोबर श्रेयस अय्यरने एक माईल स्टोन देखील पार केला.

हेही वाचा: Arjun Tendulkar: रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरने केला धमाका; ठोकले धडाकेबाज अर्धशतक

भारताच्या 48 धावात तीन विकेट पडल्यानंतर ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत भारताला शतकी मजल मारून दिली. त्याने 45 चेंडूत 46 धावांची धडाकेबाज खेळी केली. मात्र अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असतानाच तो मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. दुसऱ्या बाजूने चेतेश्वर पुजारा सावध फलंदाजी करतून एक बाजू लावून धरली होती. दरम्यान, त्याच्या जोडीला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने धावफलक हलता ठेवत धावगती चांगली राखण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: Rishabh Pant : पांढऱ्या कपड्यात पंत आला रंगात; अर्धशतक हुकले मात्र इतिहास रचला

संधी मिळताच अय्यरने मोठा फटका खेळला. अय्यर आणि पुजाराने पाचव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. याचबरोबर अय्यरने 2022 मध्ये भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा माईल स्टोन देखील पार केला. अय्यरने 2022 मध्ये 1425 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. दरम्यान, श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजारा यांनी पहिल्या दिवशीच्या चहापानापर्यंत भारताला 4 बाद 174 धावांपर्यंत पोहचवले. खेळ थांबला त्यावेळी अय्यर 41 तर पुजारा 42 धावा करून नाबाद होते.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत..