Shreyas Iyer Fitness : केएलनं शतक ठोकलं... फिटनेस दाखवून दिला तरी NCA वर लोकं का जाळ काढत आहेत?

Shreyas Iyer Fitness
Shreyas Iyer Fitness esakal

Shreyas Iyer Fitness : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यात भारताची फलंदाजी चमकली. भारताच्या पहिल्या चारही फलंदाजांना चांगली खेळी करत पाकिस्तान सारख्या कसलेल्या गोलंदाजीची दैना उडवत 356 धावांचा डोंगर उभारला.

भारताकडून रोहित शर्माने 56 तर शुभमन गिलने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर पावसाच्या सततच्या व्यत्ययानंतरही विराट कोहली आणि केएल राहुल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 233 धावांची नाबाद भागीदारी रचली. विराट कोहलीने 122 धावांची तर पाच महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलने 111 धावांची शतकी खेळी केली.

केएल राहुलने चौथ्या क्रमांकावर येत केलेल्या या खेळीत आपला फॉर्म आणि फिटनेस दोन्ही उत्तम असल्याचे दाखवून दिले. गेल्या पाच महिन्यापासून तो राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी (एनसीए) मध्ये आपल्या फिटनेसवर काम करत होता. त्याच्या एकाच खेळीमुळे चौथ्या क्रमांकावर कोण हा प्रश्न झटक्यात सोडवला. यामुळे संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित आज जाम खूष असणार.

मात्र जरी एनसीएमध्ये घाम गाळून केएल राहुल फिट झाला असला तरी भारतीय संघातील मुळचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज श्रेयस अय्यरने मात्र वर्ल्डकपच्या तोंडावर रोहित अन् संघ व्यवस्थापनाचे टेन्शन वाढवले. वर्ल्डकप संघाची घोषणा झाली त्यावेळी श्रेयस अय्यर हा 100 नाही तर 200 टक्के फिट असल्याचं सांगण्यात आलं.

मात्र आशिया कपमधील सुपर 4 फेरीतील पाकिस्तान सारख्या महत्वाच्या सामन्यात श्रेयस अय्यर जुन्यात पाठीच्या दुखापतीमुळे सामन्याला मुकला. यामुळे चाहत्यांमध्ये अय्यर पूर्णपणे फिट झाला आहे की नाही याबाबत सभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीवर देखील सोशल मीडियातून प्रश्न विचारले जात आहेत.

श्रेयस अय्यरने एनसीएमध्ये झालेल्या सराव सामन्यात 199 धावांची खेळी केली होती. त्यानंतर तो आशिया कपमध्ये पाकिस्तान विरूद्धचा पहिला सामना देखील खेळला होता. यात त्याने 9 चेंडूचा सामना करत 14 धावा केल्या. त्याला नेपाळ विरूद्धच्या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.

राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी अय्यर हाच भारताचा वनडेमधील क्रमांक चारचा फलंदाज असल्याचे ठासून सांगितले होते. मात्र वर्ल्डकपपूर्वीच अय्यरच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे एनसीएच्या कारभारवरच चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com