आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शुभांगी पाटीलला सुवर्णपदक

गोवा येथे २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय पॉवर वेटलिफ्टिंग स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली.
weightlifting
weightliftingsakal
Summary

गोवा येथे २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय पॉवर वेटलिफ्टिंग स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली.

कोल्हापूर - तुर्की देशातील इस्तंबूलमध्ये झालेल्या २०२१ ओपन सबज्युनिअर, ज्युनिअर अँड मास्टर एशिअन क्लासिक अँड इक्युपेड पॉवरलिफ्टिंग अँड बेंचप्रेस चॅम्पियनशिप स्पर्धेत (Competition) ५२ किलो वजनी गटात शुभांगी शिवाजी पाटीलने (Shubhangi Patil) सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले. अत्यंत खडतर परिस्थितीतून समाजाच्या पाठबळावर वेटलिफ्टिंगमध्ये (Weightlifting) यश मिळवणाऱ्या शुभांगीने यानिमित्त आज आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मोहर उमटवली.

weightlifting
‘बघा-आबा’ सौदीतून कोल्हापुरात

गोवा येथे २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय पॉवर वेटलिफ्टिंग स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. सध्या इस्तंबूलमध्ये स्पर्धा सुरू आहे. आज ५२ किलो ज्युनिअर गटात तिने सुवर्णपदक पटकावले. वृंदावन पार्क येथील लिप्टर पॉइंट जिम मध्ये सराव करत असून तिला प्रशिक्षक विजया कांबळे यांचे मार्गदर्शन मिळाले. ती दादू चौगुले नगर येथे रहात असून शहाजी महाविद्यालयात कला शाखेच्या तिसऱ्या वर्षात आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात

शुभांगीचे वडील सेंट्रींग कामगार आहेत तर आई शेतमजूर आहे. खेळासाठी खूप खर्च येतो. मात्र अशा परिस्थितही तिच्या आई-वडिलांनी तिला कशाची कमी पडू दिली नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी काही लाखांत खर्च येणार होता. मैत्रेयी फाउंडेशन, सतेज पाटील ग्रुप यांनी मोठी मदत केली. या शिवाय परिसरातील नागरिक, नातेवाईक आणि मित्र परिवारानेही मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com