Shubman Gill : @2000! शुभमन गिलने इतिहास रचला, आफ्रिकेच्या दिग्गज अमलालाही टाकलं मागं

Shubman Gill
Shubman Gill esakal

Shubman Gill : भारताने न्यूझीलंडचे 274 धावांचे आव्हान पार करताना आक्रमक सुरूवात केली. भारताच्या सलामीवीरांनी आठव्या षटकातच अर्धशतक धावफलकावर लागवत आपले इरादे स्पष्ट केले. दरम्यान, शुभमन गिलने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

शुबमन गिलने वनडे क्रिकेटमधील आपल्या 2000 धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे गिल हा सर्वात कमी डाव खेळून वनडे क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला. त्याने सर्वात वेगाने 2000 वनडे धावा पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत हाशिम अमलाला मागं टाकलं.

Shubman Gill
IND vs NZ Live Score : भारताला दोन धक्के; रोहित पाठोपाठ गिल देखील पॅव्हेलियनमध्ये

वनडेमध्ये सर्वात वेगवान 2000 धावा (डाव)

  • शुभमन गिल - 38 डाव

  • हाशिम अमला - 40 डाव

  • जहीर अब्बास - 45 डाव

  • केविन पिटरसन - 45 डाव

  • बाबर आझम - 45 डाव

  • रासी वॅन डेर दुसेन - 45 डाव

भारताकडून वनडेत 2000 धावा करणारे सर्वात युवा खेळाडू

  • सचिन तेंडुलकर - 20 वर्षे 354 दिवस

  • युवराज सिंग - 22 वर्षे 51 दिवस

  • विराट कोहली - 22 वर्षे 215 दिवस

  • सुरेश रैना - 23 वर्षे 45 दिवस

  • शुभमन गिल - 24 वर्षे 44 दिवस

Shubman Gill
Mohammed Shami : शामीचा ऐतिहासिक पंजा! 48 वर्षात जे घडलं नाही ते करून दाखवलं

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय सलामीवीरांनी न्यूझीलंडचे 274 धावांचे आव्हान पार करताना दमदार सुरूवात केली. रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत 40 चेंडूत 46 धावा ठोकल्या. त्याला शुभमन गिलने 26 धावा करत चांगली साथ दिली होती.

मात्र लॉकी फर्ग्युसनने पहिल्यांदा रोहित शर्माला बाद केलं. त्यानंतर शुभमन गिलची शिकार करत भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. या दोघांनी 71 धावांची सलामी दिली होती.

दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव पुढे नेण्यास सुरूवात केली. श्रेयस अय्यरने आल्या आल्या आपला दांडपट्टा सुरू करत भारताचे 16 व्या षटकात शतक धावफलकावर लावले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com