Shubman Gill Ind vs Eng : 13 डावांनंतर शुभमन गिल कसा काय आला फॉर्ममध्ये? BCCI ने शेअर केला 'तो' व्हिडिओ

India vs England: भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने बऱ्याच कालावधीनंतर शतक ठोकले...
Shubman Gill Ind vs Eng
Shubman Gill Ind vs Engsakal

Shubman Gill Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात कोणत्या संघाचे पारडे जड आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. भारतीय संघाने पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली आणि यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताची धावसंख्या 400 च्या जवळ पोहोचली. यानंतर इंग्लंडचा संघ अवघ्या 253 धावांवर ऑलआऊट झाला तेव्हा सामना भारताच्या खिशात आल्याचे दिसत होते.

पण त्यानंतर इंग्लंडने शानदार पुनरागमन करत भारताला दुसऱ्या डावात अवघ्या 255 धावांत गुंडाळले. या खेळीदरम्यान शुभमन गिलची बॅट बऱ्याच दिवसांनी बोली. या डावात त्याने शतक झळकावले.

Shubman Gill Ind vs Eng
Ind vs Eng 2nd Test : सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला रचावा लागेल इतिहास... आजपर्यंत भारतात कोणीही केलं नाही 'हे' काम

शुभमन गिलच्या शतकी खेळीमुळे संघाला चांगली धावसंख्या गाठता आली आणि विजयाची आशा कायम राहिली. गिल बराच काळ फॉर्मात नव्हता. गिलने गेल्या 13 डावांत एकही कसोटी अर्धशतक झळकावले नव्हते. त्यामुळे या खेळीदरम्यान गिलकडून कोणतीही अपेक्षा नव्हती, पण गिलने शानदार पुनरागमन करत शतक ठोकले. या खेळीनंतर बीसीसीआयने शुभमन गिलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गिलने 13 डावांनंतर तो कसा फॉर्ममध्ये आला आहे हे सांगितले.

Shubman Gill Ind vs Eng
Davis Cup Tennis : भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा ; डेव्हिस चषक टेनिस,४-० विजयासह जागतिक गटात (एक) प्रवेश

शुभमन गिल म्हणाला की, 3-4 सामन्यांमध्ये धावा करता आल्या नाही, तर नंतर धावा काढणे खूप महत्त्वाचे असते. मी शतक झळकावले हा माझ्यासाठी आजचा दिवस मोठा आणि आनंदाचा आहे. जेव्हा माझ्या बॅटमधून धावा होत नव्हत्या, तो हा काळ माझ्यासाठी सोपा नव्हता. त्यावेळी माझे वडील म्हणाले, सध्या जे काही चालले आहे ते विसरून जा आणि जुन्या फॉर्ममध्ये खेळण्याचा प्रयत्न कर. मग हे मी माझ्या फलंदाजीत लागू केले आणि शतक ठोकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com