NZ vs IND 1st T20I : मलिकचा वेग वेलिंग्टनमध्ये वारं करणार; अशी असेल भारताची Playing 11 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Zealand Vs India 1st T20I Playing 11

NZ vs IND 1st T20I : मलिकचा वेग वेलिंग्टनमध्ये वारं करणार; अशी असेल भारताची Playing 11

New Zealand Vs India 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20 सामना शुक्रवारी (दि 18) वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर होणार आहे. भारत न्यूझीलंड दौऱ्यावर तीन टी 20 आणि त्यानंतर तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी 20 मालिकेसाठी भारताचा युवा संघ काही अनुभवी खेळाडूंसोबत मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने वर्ल्डकप संघातील अनेक खेळाडूंना विश्रांती दिली आहे. या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार असून वनडे संघाचे नेतृत्व शिखर धवनच्या खांद्यावर असेल.

रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली ही टॉप ऑर्डर विश्रांती घेत असल्याने या जागेवर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. तसेच भारताची स्पीड गन उमरान मलिकला देखील न्यूझीलंडवरील वेगवान खेळपट्ट्यांवर आजमावले जाईल का याची देखील उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यासाठी प्लेईंग 11 कशी असेल हे पाहणे गरजेचे आहे.

हेही वाचा: David Warner VIDEO : डेव्हिड वॉर्नरने लाईव्ह सामन्यादरम्यान शर्ट मागणाऱ्या चाहत्याला दिले भन्नाट उत्तर

खेळपट्टी कशी आहे?

वेलिंग्टनवरील स्काय स्टेडियमवर भारताचा पहिला टी 20 सामना हा स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होणार आहे. तर भारतात हा सामना दुपारी 12 वाजता दिसणार आहे. या सामन्यासाठी वेलिंग्टनवर स्पोर्टी खेळपट्टी मिळण्याची शक्यता आहे. या स्टेडियमवर आतापर्यंत 15 टी 20 सामने खेळले गेले आहेत. यातील 8 वेळा चेंस करणारा संघ जिंकला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना या मैदानावर सरासरी धावसंख्या ही 162 इतकी आहे. 2019 मध्ये टीम सैफर्डटने 84 धावा केल्या होत्या. ही या मैदानावरील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. तर एश्टन एगरन 30 धावात 6 विकेट घेतल्या होत्या. ही या मैदानावरील बेस्ट बॉलिंग फिगर आहे.

हवामानाचा अंदाज काय?

शुक्रवारच्या सामन्यात तापमना 18 डिग्री सेल्सियस असण्याची शक्यता आहे. शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये पावसाची दाट शक्यता आहे. तर हवामानात 80 टक्के आद्रता असणार आहे. सामन्यात पावसाची शक्यता असली तरी हा पाऊस फारकाळ राहू नये आणि याचा सामन्यावर फरक पडू नये अशी चाहते अपेक्षा करत असतील. वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था उत्तम असल्याने मैदान ओलं राहण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

भारताची Playing 11

शुभमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर / दीपक हुड्डा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

भारताचा संपूर्ण संघ : हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुड्डा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज