Shubman Gill Babar Azam : विराट सोडा फक्त 21 वनडे खेळलेल्या शुभमन गिलने बाबरला गाठले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shubman Gill Equals Babar Azam ODI Record

Shubman Gill Babar Azam : विराट सोडा फक्त 21 वनडे खेळलेल्या शुभमन गिलने बाबरला गाठले

Shubman Gill Equals Babar Azam ODI Record : भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामी जोडीने किवींच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत 26 षटकात 212 धावांची द्विशतकी सलामी दिली. रोहित शर्माने 101 तर गिलने 112 धावांची शतकी खेळी केली. याचबरोबर शुभमन गिलने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली.

हेही वाचा: IND vs NZ 3rd ODI LIVE : रोहित-गिलच्या झंझावातानंतर टीम इंडियाचा डाव कोलमडला

शुभमन गिलसाठी न्यूझीलंडविरूद्धची ही वनडे मालिका स्वप्नवत राहिली आहे. गिलने पहिल्याच सामन्यात 208 धावांची द्विशतक खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 40 धावा केल्या. यानंतर आज इंदौर येथे होत असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात गिलने 112 धावांची शतकी खेळी केली.

गिलने तीन सामन्यात 360 धावा ठोकल्या आहेत. याचबरोबर गिलने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या विक्रमाशी बरोबरी साधली. बाबर आझमने 2016 ला वेस्ट इंडीजविरूद्धच्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता.

आता या विक्रमाची बरोबर गिलने न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे मालिकेत केली. याचबरोबर गिल हा भारताकडून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दोन शतके ठोकणारा विराट कोहलीनंतरचा दुसरा फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा: Rohit Sharma : @100! तब्बल 16 महिन्यांनंतर हिटमॅन पोहचला तिहेरी आकड्यात

शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी 212 धावांची सलामी दिल्यानंतर भारतीय संघाला न्यूझीलंडने पाठोपाठ धक्के देण्यास सुरूवात केली. रोहित शर्मा 108 धावा करून 27 व्या शटकात तर गिल 112 धावा करून 28 व्या षटकात बाद झाले. त्यानंतर इशान किशन 17 धावा करून धावबाद झाला. तर विराट कोहली 27 चेंडूत 36 धावा करत जेकब डफीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

विराट कोहली बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने 9 चेंडूत 14 धावा केल्या खऱ्या मात्र त्यालाही डफीने बाद करत भारताला 293 धावांवर पाचवा धक्का दिला.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी