Shubman Gill : 2022 मध्ये शुभमनचा बोलबाला! अखेर 23 इनिंगनंतर करून दाखवलंच

Shubman Gill : 2022 मध्ये शुभमनचा बोलबाला! अखेर 23 इनिंगनंतर करून दाखवलंच

Shubman Gill Hit maiden Test Century : शुभमन गिनले अखेर 12 कसोटी सामन्यातील 23 डाव खेळल्यानंतर आपले पहिले कसोटी शतक ठोकले. त्याने बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 152 चेंडूत 110 धावा चोपल्या. त्याच्या या शतकाच्या जोरावरच भारताने दुसऱ्या डावात 180 च्या वर धावा चोपल्या. भारताची आघाडी 400 पार पोहचली आहे. शुभमन गिलने आजच्या सामन्यात शतकाबरोबरच अजून एक माईलस्टोन पार केला. तो 2022 मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय सलामीवीर ठरला.

भारताने बांगलादेशचा पहिला डाव 150 धावात गुंडाळल्यानंतर फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामी जोडी केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी 70 धावांची दमदार भागीदारी रचली. यात शुभमन गिलच्या आक्रमक खेळाची वाटा मोठा होता.

केएल राहुल 23 धावा करून बाद झाल्यानंतर शुभमन गिलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. गिलने संधी मिळताच मोठे फटके मारत टी टाईमपर्यंत 80 धावांपर्यंत मजल मारली. टी टाईमनंतर गिलने आपले शतक पूर्ण करण्यासाठी फार वेळ लावला नाही. त्याने चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले.

गिलने पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचली. गिल 152 चेंडूत 110 धावा करून माघारी परतला. यानंतर पुजारने आपला गिअर बदलला आणि चौकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com