IND vs NZ: 9 दिवस 4 डाव 3 शतक! शुभमन गिल पाडतोय धावांचा पाऊस

Shubman Gill Century
Shubman Gill Century

Shubman Gill Century : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. शुभमन गिलने किवी गोलंदाजांना जोरदार मुसंडी मारत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. गेल्या 9 दिवसांत त्याने तिसरी मोठी इनिंग खेळली आहे.

शुभमनने याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 208 धावा केल्या होत्या आणि त्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गिलने 116 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती.

Shubman Gill Century
ICC Men's Test Team : ना विराट ना पुजारा लायक फक्त ऋषभ पंतच; ICC ने केली घोषणा...

किवी संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाठवले. टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीने येताच किवीजवर वर्चस्व गाजवले. एका बाजूने कर्णधार रोहित शर्मा तर दुसरीकडे गिलने आपला क्लास दाखवत होता. दोन्ही फलंदाजांनी एकत्र येऊन शानदार शतक झळकावले. हिटमॅनने शतक पूर्ण करण्यासाठी 82 चेंडू खर्च केले तर गिलने अवघ्या 72 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.

Shubman Gill Century
Rohit Sharma : @100! तब्बल 16 महिन्यांनंतर हिटमॅन पोहचला तिहेरी आकड्यात

टीम इंडियाच्या या खेळाडूने पहिल्या वनडेत झंझावाती द्विशतक झळकावले होते. त्यानंतर त्याने अनेक मोठे रेकॉर्ड नष्ट केले होते. शुभमन गिल 78 चेंडूत 112 धावा करून बाद झाला. त्याने 13 चौकार आणि पाच षटकार मारले. कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म ही टीम इंडियासाठी मोठी समस्या बनून राहिली. मात्र आता रोहितने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्याने 1100 दिवसांनंतर शतकी खेळी खेळली आहे. रोहितने 85 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांसह 101 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com