Shubman Gill : प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेटचा फक्त एक धक्का अन् बाबरचं साम्राज्य होणार खालसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shubman Gill Babar Azam ICC ODI Ranking

Shubman Gill : प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेटचा फक्त एक धक्का अन् बाबरचं साम्राज्य होणार खालसा

Shubman Gill Babar Azam ICC ODI Ranking : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेत भारताच्या सर्व प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. या संधीचा फायदा घेत संघातील तरूण खेळाडूंनी कांगारूंसारख्या तगड्या संघाविरूद्ध आपला दम दाखवून दिला. यात सर्वात आघाडीवर होता तो शुबमन गिल!

भारतीय क्रिकेटचा प्रिन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुभमन गिलने पहिल्या वनडे सामन्यात 74 धावांची दमदार खेळी करत ऋतुराजसोबत शतकी सलामी दिली होती. आता त्याने दुसऱ्या वनडे सामन्यात 104 धावांची दमदार शतकी खेळी करत आपण भारताच्या ग्रेट फलंदाजांच्या पंक्तीत बसण्याची क्षमता ठेवतो हे सिद्ध करून दाखवलं.

याचबरोबर शुभमन गिलने आयसीसी वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या बाबर आझमला मोठे आव्हान निर्माण केले. बाबर आझमला अव्वल स्थानावरून खाली खेचण्यासाठी शुभमन गिलला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत 200 धावा करणे गरजेचे आहे.

गिलने पहिल्या सामन्यात 74 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने दुसऱ्या वनडे सामन्यात 97 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी केली. आता तो आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर विराजमान होण्यासाठी फक्त 22 धावा दूर आहे. त्याच्याकडे अजून एक सामना हातात आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धचा राजकोटविरूद्धच्या सामन्यात गिलने जर 22 धावा केल्या तर तो आगामी वनडे वर्ल्डकपमध्ये वनडे रँकिंगमधील नंबर एकचा फलंदाज म्हणून मिरवेल.

बाबर आझम सध्या 857 रेटिंग पॉईंट्स घेऊन वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर शुभमन गिलचे 814 रेटिंग पॉईंट्स झाले आहेत. तो सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. आता त्याला फक्त 22 धावांची गरज आहे. त्यापूर्वी शुभमन गिलने बाबर आझमचा 2023 मधील सर्वाधिक शतकी भागीदारी करण्याचा विक्रम मोडला आहे. बाबर आझमने 6 शतकी भागीदारी रचल्या होत्या. गिलने सात शतकी भागीदारी रचून हा विक्रम मोडला.

शुभमन गिलचे हे 2023 मधील पाचवे शतक आहे. अजून वर्ल्डकप सारखी मोठी स्पर्धा व्हायची आहे. त्यामुळे गिल सचिन तेंडुलकरचे एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा (1894) करण्याचा विक्रम देखील मोडू शकतो. शुभमन गिलने आताच 1200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अजून त्याच्या हातात 13 ते 15 सामने आहेत.

(Sports Latest News)