
लंडन : विम्बल्डन ग्रँडस्लॅममधील अंतिम फेरीच्या लढतीआधी कार्लोस अल्काराझ याने सलग पाच लढतींमध्ये यानिक सिनरला पराभूत केले होते. यामध्ये फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅममधील जेतेपदाच्या लढतीचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर इटलीच्या सिनर याने विम्बल्डनमधील जेतेपद पटकावल्यानंतर अल्काराझवरील विजय अत्यंत महत्त्वाचा ठरला, अशा शब्दांत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.