Hasan Ali Viral Video : पाकिस्तानी गोलंदाजाच्या अंगात आला 'नटरंग' मैदानावरच लावले ठुमके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hasan Ali Viral Video dance moves during

पाकिस्तानी गोलंदाजाच्या अंगात आला 'नटरंग' मैदानावरच लावले ठुमके

Hasan Ali Viral Video SL vs PAK : पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. ही मालिका गॉलमध्ये खेळली जात आहे. पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अली फलंदाजांना बाद केल्यानंतर त्याच्या खास विकेट सेलिब्रेशनमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळेस तो सामन्यादरम्यान मजेशीर पद्धतीने डान्स केल्यामुळे चर्चेत आला आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये हसन अली हारिस रौफसमोर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हारिस रौफही हसन अलीच्या सीमेबाहेरच्या डान्सचा आनंद घेत आहे. हसनचा हा अनोखा डान्स पाहून हरिसलाही हसू आवरता येत नाही. तर दुसरीकडे समालोचक डॅनी मॉरिसनही हसन अलीचा हा डान्स पाहून अवाक झाला आहे.

Web Title: Sl Vs Pak Hasan Ali Viral Video Dance Moves During Sri Lanka Vs Pakistan Test Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..