मैदानात दुर्घटना; हेल्मेटवर चेंडू लागून कॅरेबियन खेळाडू जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jeremy Solozano
मैदानात दुर्घटना; हेल्मेटवर चेंडू लागून कॅरेबियन खेळाडू जखमी

मैदानात दुर्घटना; हेल्मेटवर चेंडू लागून कॅरेबियन खेळाडू जखमी

SL vs WI: श्रीलंका आणि वेस्ट इंडीज यांच्यात गालेच्या मैदानात पहिला कसोटी सामना रंगला आहे. या सामन्यादरम्यान वेस्ट इंडीजचा खेळाडू जेरेमी सोलोजानोला गंभीर दुखापत झालीये. जेरेमी सोलोजानो फॉरवर्ड शॉर्ट लेगला फिल्डिंग करत होता. दिमुथ करुणारत्नने ताकदीनं खेळलेला फटका हेल्मेटच्या ग्रिलवर बसला. त्याचा चेंडू लागल्यानंतर स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जेरमीसाठी हा पदार्पणाचा सामना होता.

कधी आणि कशी घडली घटना

श्रीलंकेच्या डावातील 24 व्या षटकात हा प्रकार घडला. रोस्टन चेजच्या गोलंदाजीवर श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेनं जोरदार फटका खेळला. काही क्षणात चेंडू पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या जेरेमीच्या हेल्मेटवर आदळला. चेंडू लागल्यानंतर त्याने पटकन हेल्मेट काढले आणि तो जमिनीवर कोसळला.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर जेरेमीचे स्कॅन करण्यात आले आहे. त्याला कोणत्याही प्रकारचे फॅक्चर नाही. पुढील काही तास त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली आहे.

loading image
go to top