Ollie Robinson Controversy : जित्याची खोड... वर्णद्वेशी रॉबिन्सनने ख्वाजाविरूद्धच्या सेलिब्रेशनचं केलं समर्थन

Ollie Robinson Usman Khawaja Controversy Ashes Series
Ollie Robinson Usman Khawaja Controversy Ashes Series esakal

Ollie Robinson Usman Khawaja Controversy Ashes Series : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना बर्मिंगहम येथे सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रविवारी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 386 धावात गुंडाळला. पहिल्या डावात सात धावांची माफक आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात 28 धावा करत ही आघाडी 35 धावांपर्यंत पोहचवली.

ऑस्ट्रेलियाने 5 बाद 311 धावांपासून दिवसाची सुरूवात केली. मात्र स्टुअर्ट ब्रॉड आणि ओली रॉबिन्सन यांनी चांगला मारा करत कांगारूंना पहिल्या डावात आघाडी घेण्यापासून रोखले. यादरम्यान, रॉबिन्सनने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाचा 141 धावांवर त्रिफळा उडवला. यानंतर रॉबिन्सनने आक्षेपार्ह सेलिब्रेशन केले. यावरून त्यावर सध्या खूप टीका होत आहे. मात्र रॉबिन्सनने आपल्या कृतीचे समर्थन केले आहे.

Ollie Robinson Usman Khawaja Controversy Ashes Series
Shikhar Dhawan : तुम्ही शिखर धवनला कर्णधार करता... वेंगसरकरांनी BCCI, निवडसमितीवरच काढला जाळ

काय म्हणाला रॉबिन्सन?

रॉबिन्सन दिवसाचा खेळ संपल्यावर म्हणाला की, 'ही माझी पहिली अ‍ॅशेस मालिका आहे. त्यामुळे मोठी विकेट घेणे हे माझ्यासाठी खास आहे. मला वाटते की उस्मान ख्वाजाने दमदार खेळी केली. एक संघ म्हणून आम्ही त्याची विकेट घेणे हे खूप मोठे होते. ऑस्ट्रेलियाची स्थिती 5 बाद 338 धावा अशी होती. त्यावेळी ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात आघाडी घेणार असे वाटत होते.

मात्र याच धावसंख्येवर एलेक्स कॅरी 66 धावा करून बाद झाला. त्यानंतर उस्मान ख्वाजा देखील 141 धावा करून रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 118 धावांची शतकी भागीदारी केली होती.

Ollie Robinson Usman Khawaja Controversy Ashes Series
'एक दिवस त्यांच्याच धर्मातील लोक त्यांचा काटा...'; पाकच्या माजी दिग्गज क्रिकेटरची PM मोदींवर जहरी टीका

जित्याची खोड...

इंग्लंडचा 29 वर्षाचा ओली रॉबिन्सन फलंदाजाला शिवीगाळ केल्याने पहिल्यांदाच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नाही. 2021 मध्ये कसोटी पदार्पण करण्यापूर्वी तो वर्णद्वेशी आणि लिंगद्वेशी ट्विट करण्यामुळे बदनाम झाला होता. रॉबिन्सनने हे ट्विट 2012 ते 2013 च्या दरम्यान केले होते. त्यावेळी त्याचे वय हे 18 वर्षे होते.

त्यावेळी त्याने आपल्या ट्विटमध्ये विशिष्ट धर्माच्या लोकांना दहशतवादी म्हटले होते. त्याने आशियाई वंशाच्या महिलांविरूद्ध अपमानजनक टिप्पणी केली होती. या कृतीसाठी त्याला क्रिकेट शिस्तपालन समितीने आठ सामन्यांची बंदी घातली होती.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com