स्मृती मानधनाच्या सुसाट 2000 धावा; टाकले कोहलीलाही मागे

वृत्तसंस्था
Thursday, 7 November 2019

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिने गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतकी खेळी करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान दोन हजार धावा पूर्ण करण्याचा मान मिळविला. अशी कामगिरी करणारी ती तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. 

अँटिगा : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिने गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतकी खेळी करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान दोन हजार धावा पूर्ण करण्याचा मान मिळविला. अशी कामगिरी करणारी ती तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. 

आता कसाही खेळ धवन, तुला आहे 'या' युवा खेळाडूचा तगडा पर्याय 

स्मृतीने कारकिर्दीमधील 51व्या खेळीतच ही उपलब्धी साकार केली. अशी कामगिरी करणारी ती तिसरी महिला क्रिकेटपटू असली, तरी भारतीय क्रिकेटमधील ती दुसरीच खेळाडू ठरली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान दोन हजार धावा 38 खेळीत करण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. 

टाचेच्या दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या मानधनाने आज "मॅच विनिंग' खेळी करताना 63 चेंडूंत 74 धावा केल्या. तिच्या खेळीने भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 6 गडी राखून विजय मिळवताना मालिका 2-1 अशी जिंकली. मानधनाने 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. 

प्रथम फलंदाजी करताना विंडीज महिलांना 194 धावांचीच मजल मारता आली. कर्णधार स्टेफनी टेलर (79) हिची खेळी महत्वाची ठरली. तिला स्टेसी किंग (38) हिची साथ मिळाली. भारताकडून झुलन गोस्वामी आणि पूनम यादव दोघींनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 

कधीकाळी विराटच्या टीममध्ये खेळला, आता फिक्सिंगमुळे जेलमध्ये गेला

आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिलांनी 42.1 षटकांत 4 बाद 195 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज (69) आणि मानधना यांच्या 141 धावांच्या सलामीनेच भारताचा विजय निश्‍चित झाला. त्यानंतर पूनम राऊत आणि मिताली राज यांनी आपले योगदान देत भारताचा विजय साकार केला. 

संक्षिप्त धावफलक : 
वेस्ट इंडिज 50 षटकांत सर्वबाद 194 (स्टेफनी टेलर 79 -112 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, स्टेसी किंग 38, झुलन गोस्वामी 2-30, पूनम यादव 2-35) 
भारत 42.1 षटकांत 4 बाद 195 (जेमिमा रॉड्‌ग्÷िग्ज 69 -92 चेंडू, 6 चौकार, स्मृती मानधना 74 -63 चेंडू, 9 चौकार, 3 षटकार, पूनम राऊत 24, हेली मॅथ्यूज 3-27) 

मानधनाचा विक्रम 
-दोन हजार धावा 51व्या सामन्यात 
-मानधनाच्या 2025 धावा 43.08च्या सरासरीने 
-विराट कोहली (53), सौरभ गांगुली (52) आणि नवज्योतसिंग सिद्धू (52) यांना टाकले मागे 
-भारताकडून सर्वात वेगवान कामगिरी शिखर धवनची 48 सामन्यात 
-तिसरी महिला क्रिकेटपटू. यापूर्वी बेलिंडा क्‍लार्क (45 सामने), मेग लॅनिंग (45 सामने)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smriti Mandhana Becomes Second Fastest Indian to Score 2000 ODI Runs