LLC : जॉन्सनच्या लखनौमधील हॉटेल रूममध्ये सापडला साप, म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Snake In Mitchell Johnson Hotel Room

LLC : जॉन्सनच्या लखनौमधील हॉटेल रूममध्ये सापडला साप, म्हणाला...

Snake In Mitchell Johnson Hotel Room : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन सध्या लेजंड लीग क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी भारतात आला आहे. सध्या लखनौमध्ये असलेल्या जॉनसनला एक धक्कादायक अनुभव आला. त्याच्या हॉटेलमध्ये साप सापडला. याबाबतचे फोटो जॉन्सनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. यावेळी चाहत्यांनी त्याला हा कोणत्या प्रजातीचा साप आहे हे देखील शोधून काढण्यास मदत केली.

हेही वाचा: हा कसला आंतरराष्ट्रीय T20I सामना? 3 षटकात 'खतम, बाय-बाय, टाटा...'

जॉन्सन आपल्या इन्स्टाग्रमवर या सापाचे फोटो शेअर करत म्हणला की, 'कोणाला माहिती आहे का हा कोणत्या प्रकारचा साप आहे? हा माझ्या हॉटेल रूमच्या बाहेर फिरत होता.' जॉन्सनच्या या पोस्टवर ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज वेन फिलेंडर यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: Sunil Gavaskar : पंत की कार्तिक; गावसकर म्हणतात, धोका पत्करल्याशिवाय...

जॉन्सनने सापाचा अजून एक फोटो शेअर करत लिहिले की सापाचा अजून एक चांगला फोटो मिळाला, हा कोणता साप आहे हे अजून समजले नाही. लखनौ, भारतातील आतापर्यंतचा सर्वात चांगला स्टे!' जॉन्सनने लेजंड लीग क्रिकेट स्पर्धेत भारताला मोठा धक्का दिला होता. त्याने विरेंद्र सेहवागला बाद केले होते. त्याने 3 षटकात फक्त 22 धावा दिल्या.

Web Title: Snake Found In Australia Former Pacer Mitchell Johnson Lucknow Hotel Room

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..