Sourav Ganguly : आयसीसी अध्यक्षपदासाठी गांगुली उतरणार रिंगणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sourav Ganguly

Sourav Ganguly : आयसीसी अध्यक्षपदासाठी गांगुली उतरणार रिंगणार?

Sourav Ganguly : एकीकडे बीसीसीआयच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा अध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात करण्यात आले, परंतु गांगुली आता आयसीसीच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Pro Kabaddi : मोठी दुर्घटना! पहिल्याच सामन्यात सर्वात महागडा खेळाडू स्ट्रेचरवरून बाहेर

जगातील क्रिकेटचे व्यवस्थापन आणि संचालन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान होण्याची शक्यता आयसीसीने वर्तवली आहे; तर या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर असणार आहे. आयसीसीच्या कार्यकारी मंडळाची बैठक नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणार असून; त्याचदरम्यान २०२२ ते २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी आयसीसीच्या नवीन अध्यक्षाची निवड होणार आहे. बर्मिंगहॅममध्ये जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत आयसीसीने नवीन अध्यक्षासाठी साध्या बहुमताने निवड करण्यात येईल अशी घोषणा केली होती.

हेही वाचा: IND vs SA : भारताचा पाय आणखी खोलात, रांचीमध्येही जोरदार पाऊस, सामन्यावर प्रश्नचिन्ह

अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत विजयाकरिता आधी दोन-तृतीयांश मतांची गरज होती. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले हे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का, हे अद्याप स्पष्ट नसले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) सौरव गांगुली यांचे नाव पुढे करण्यात येण्याची शक्यता अधिक आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.