सौरव गांगलींची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती; जय शहा सचिव

वृत्तसंस्था
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली याची बिनविरोध निवड झाली आहे.

मुंबई : माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली याची बिनविरोध निवड झाली आहे.

हम जहा जाते है वहा के कॅप्टन होते है!

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची सचिनवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  तर भाजपचे मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण धुमाळ यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

भारतीय क्रिकेट मंडळाची बहुचर्चित निवडणूकीअगोदर महत्वाची घटना घडली आहे. बीसीसीआयशी संलग्न असलेल्या राज्य संघटनांच्या आणि माजी पदाधिकाऱ्यांची आज बैठक होऊन महत्वाच्या तीन पदांसाठी नावे निश्चित करण्यात आली . 

 

ब्रिजेश पटेल यांच्यासाठी तमिळनाडूचे एन. श्रीनिवासन यांनी लॉबिंग केले होते, परंतु अनेकांनी त्यास विरोध केला आणि अखेरच्या क्षणी गांगुली यांचे नाव पुढे आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sourav Ganguly declared as a new BCCI President