Sourav Ganguly
Sourav Gangulyesakal

सौरभ गांगुलीची विराटच्या पत्रकार परिषदेवर पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी घेतलेल्या वादळी पत्रकार परिषदेवर बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने (Sourav Ganguly) आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीने पत्रकार परिषदेत (Press Conference) सौरभ गांगुलीने केलेल्या वक्तव्याच्या उलट वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती. यावर सौरभ गांगुली काय म्हणणार याची सर्वांनाच प्रतिक्षा होती. अखेर सौरभ गांगुलीची प्रतिक्रिया आली आहे. (Sourav Ganguly Reaction On Virat Kohli Statement)

Sourav Ganguly
पाकमध्ये गोळीपासून संरक्षण कोरोनापासून नाही; विंडीज संघ कोरोनाग्रस्त!

सौरभ गांगुलीने (Sourav Ganguly) स्थानिक पत्रकारांना याविषयी आपली प्रतिक्रिया दिली. सौरभ गांगुली म्हणाला, 'कोणतेही वक्तव्य करणार नाही. कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही. आम्ही काय करायचे ते पाहून घेऊ. हे बीसीसीआयवर सोपवा.'

Sourav Ganguly
डिव्हिलियर्स सह दिग्गजांवर वर्णभेदाचे आरोप

सौरभ गांगुलीची प्रतिक्रिया येण्यापूर्वी विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेला निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी उत्तर द्यावे अशी चर्चा बीसीसीआयमध्ये सुरु होती. पण, बीसीसीआयने (BCCI) हे प्रकरण अजून वाढवणे टाळले. विराट कोहलीने (Virat Kohli) बुधवारी केलेल्या वक्तव्याचा रोख होती की जे काही सौरभ गांगुली यांनी वक्तव्य केले ते खरे नाही. मला कोणीही टी 20 चे कर्णधारपद सोडू नको असे सांगितले नाही.

सौरभ गांगुलीने (Sourav Ganguly) मी स्वतः विराट कोहलीला टी 20 कर्णधारपद सोडू नको असे सांगितले होते. विराट कोहली आणि सौरभ गांगुली यांची ही वक्तव्ये परस्पर विरोधी आहेत. त्यामुळेच माध्यमांमध्ये या वक्तव्यांमुळे गोधळ आणि खळबळ निर्माण झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com