गांगुलीने 'बायको आणि गर्लफ्रेंड' वक्तव्य करुन घेतला वाद ओढवून | Sourav Ganguly | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sourav Ganguly
गांगुलीने 'बायको आणि गर्लफ्रेंड' वक्तव्य करुन घेतला वाद ओढवून

गांगुलीने 'बायको आणि गर्लफ्रेंड' वक्तव्य करुन घेतला वाद ओढवून

गुरुग्राम : बीसीसीआय आध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) गेल्या काही दिवसांपासून सारखा चर्चेत आहे. आधी विराट कोहली प्रकरणामुळे तो चर्चेत होता. आता तो स्वतःच्याच एका वक्तव्यामुळे चर्चेत किंबहुणा वादात अडकला आहे. सौरभ गांगुलीची वक्तव्य सध्या सर्वजण कान देऊन ऐकत असतात. सौरभ गांगुलीने गुरुग्राममध्ये केलेल्या एका वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. (Sourav Ganguly Sexist Statement)

सौरभ गांगुलीला या कार्यक्रमादरम्यान, सध्या भारतीय क्रिकेट (Indian Cricket) वर्तृळात सुरु असलेल्या वादाविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले. याचवेळी सौरभ गांगुलीला हा सगळा ताण कशा प्रकारे हाताळता असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे सोशल मीडियावर वादंग निर्माण झाले.

सौरभ गांगुली (Sourav Ganguly Wife) या प्रश्नावर गंमतीने 'माझ्या आयुष्यात कोणताच ताण नाही. फक्त बायको आणि गर्ल्डफ्रेंड ताण देतात.' असे म्हणाला. त्याचे हे उत्तर अनेक नेटकऱ्यांना आवडले नाही. त्यांनी सौरभ गांगुलीवर लिंगभेद करत असल्याचा आरोप केला. सौरभ गांगुलीला भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक समजले जाते. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे.

मात्र सौरभ गांगुलीचे ताजे वक्तव्य हे सार्वजनिक ठिकाणी काय बोलले पाहिजे आणि काय नाही यातील फरक स्पष्ट करणारे ठरले आहे. सौरभ गांगुलीला याच कार्यक्रमात तुम्हाला कोणत्या खेळाडूचा अॅटिट्यूड आवडतो असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याने 'मला विराट कोहलीचा (Virat Kohli) अॅटिट्यूड आवडतो मात्र तो खूप भांडतो असे वक्तव्य केले होते.' असे उत्तर दिले होते. हे उत्तर सध्याच्या एकदिवसीय कर्णधारपदावरून विराटची उचलबांगडी झाल्यानंतर फार महत्वाचे आहे. बीसीसीआयने एकदिवसीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडून काढून घेत रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपले आहे.

Web Title: Sourav Ganguly Sexist Statement Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketSourav GangulyBCCI