INDvsWI : काय सलामीवीर निवडलेत? रोहितपेक्षा भारी का ते?; दादा भडकला

वृत्तसंस्था
Thursday, 22 August 2019

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात सलामीला कोण खेळणार या प्रश्न कर्णधार विराट कोहलीने सोडवला असला तरी मयांक अगरवाल आणि लोकेश राहुलऐवजी रोहित शर्मालाच सलामीला खेळवावे असा सल्ला भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने दिला आहे. 

ऍंटीग्वा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात सलामीला कोण खेळणार या प्रश्न कर्णधार विराट कोहलीने सोडवला असला तरी मयांक अगरवाल आणि लोकेश राहुलऐवजी रोहित शर्मालाच सलामीला खेळवावे असा सल्ला भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने दिला आहे. 

''रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यापैकी कोणाला सलामीला पाठवायचा हा प्रश्न असावा. रोहित विश्वकरंडाकमध्ये तुफान फॉर्मात होता. मात्र, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती तर रहाणेनेसुद्धा ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली फलंदाजी करता आली नव्हती,'' असे मत गांगुलीने व्यक्त केले.  

त्यामुळेच गांगुलीच्यामते रोहित विश्वकरंडकातील फॉर्म कायम ठेवेल आणि म्हणूनच रोहित शर्माला सलामीवीर म्हणून पाठवावे तर रहाणेला मधल्या फळीत खेळवावे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sourav Ganguly Suggests India To Play Rohit Sharma As Opener In Tests