SA vs NED : आफ्रिकेने 'चोकर्स'पणा दाखवलाच!ऑरेंज आर्मीनं केला वर्ल्डकपमधील दुसरा उलटफेर

South Africa vs Netherlands
South Africa vs Netherlandsesakal

South Africa vs Netherlands : वर्ल्डकप 2023 मध्ये धडाक्यात सुरूवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँडने चांगलाच घाम काढला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदलँडने 5 बाद 82 पासून 245 धावांपर्यंत मजल मारत आफ्रिकेच्या गोलंदाजांना मोठा झटका दिला.

या झटक्यातून संघ सावरण्याचा प्रयत्न करत असतानाचा नेदरलँडचा गोलंदाजांनी एका पाठोपाठ एक आफ्रिकेचे दिग्गज फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडण्यास सुरूवात केली बघता बघता त्यांची अवस्था 4 बाद 44 धावा अशी झाली.

South Africa vs Netherlands
SA vs NED : कॅप्टन असावा तर असा! तळातील फलंदाजांसोबत केल्या 140 धावा

नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्डने 78 धावांनची नाबाद खेळी करत संघाला 245 धावांपर्यंत पोहचवले होते. यानंतर दक्षिण आफ्रिकेची स्टार फलंदाजी हे आव्हान पार करताना दमदार सुरूवात करेल अशी अपेक्षा होती. स्पर्धेत दोन शतके ठोकलेला क्विंटन डिकॉकवर आफ्रिकेची मदार होती.

त्याने आपल्या डावाची सुरूवात देखील आक्रमक करण्याचा प्रयत्न केला. मात्र 22 चेंडूत 20 धावा केल्यानंतर एकरमनने त्याला बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. डिकॉक आठव्या षटकात बाद झाला. मात्र त्यानंतर नेदरलँडने आफ्रिकेला 10 व्या 11 व्या आणि 12 व्या षटकात असे सलग तीन धक्के देत त्यांचे तोंडचे पाणी पळवले.

मेरवेने 16 धावा करणाऱ्या टेम्बा बाऊमाला बाद केले. त्यानंतर मीकेरनने मारक्रमला 1 धावेवर बाद करत आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. आफ्रिकेची पडझड इथंपर्यंतच थांबेल असे वाटत होते. मात्र मेरवेने दुसेनला देखील 4 धावांवर चालतं केलं.

South Africa vs Netherlands
Pakistan Cricket Team : डेंग्यू - कोरोना चाचणी, पराभवानंतर पाकची अवस्था खराब; तीन खेळाडूंनी बाबरचं टेन्शन वाढवलं

आफ्रिकेची अवस्था 4 बाद 44 झाल्यानंतर अखेर हेन्रिच क्लासेन आणि डेव्हिड मिलर या जोडीने फुटलेल्या धरणारा बांध घालण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी भागीदारी रचत 17 षटकात संघाला 80 धावांपर्यंत मजल मारून दिला. आता त्यांच्यावरच आफ्रिकेची गर्तेत अडलेली नौका पार लावण्याची जबाबदारी होती.

या जोडीने 45 चेंडूत 45 धावांची भागीदारी रचली. मात्र वॅन बीकने क्लासेनला 28 धावांवर बाद केले. यामुळे आफ्रिकेची अवस्था 5 बाद 89 धावा अशी केली. यानंतर मार्को येनसेन 9 धावा करून बाद झाला.

South Africa vs Netherlands
PCB Zaka Ashraf : झाका अश्रफ यांनी घेतली तातडीची बैठक, अहमदाबादमधील 'त्या' घटनांची आयसीसीकडे केली तक्रार

दरम्यान, डेव्हिड मिलर आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता. मात्र बीकने त्याचा त्रिफळा उडवत आफ्रिकेला सातवा आणि मोठा धक्का दिला. 150 धावांचा टप्पा देखील पार न केलेल्या आफ्रिकेला लीड्सने अजून एक धक्का दिला. सेट झालेला जेराल्ड कोएट्झी 22 धावा करून परतला.

आफ्रिकेची अवस्था 8 बाद 147 अशी झाली होती. आफ्रिकेचा केशव महाराज हा अष्टपैलू अजून क्रीजवर होता. आफ्रिकेसाठी तो शेवटचा आशेचा किरण होता. मात्र त्याच्यासमोर 59 चेंडूत 98 धावांचे मोठे आव्हान होते. त्याने 40 धावा करत आफ्रिकेला 207 धावांपर्यंत पोहवचले खरे मात्र ब्रीकने त्यालाही बाद करत आफ्रिकेचा पराभव निश्चित केला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com