रिषभ पंतचे नेतृत्व पणास; भारत - द. आफ्रिका दुसरी लढत आज

कटकमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड खराब
India vs South Africa 2nd T20I
India vs South Africa 2nd T20Isakal
Updated on

India vs South Africa 2nd T20I : डेव्हिड मिलर व रॅसी वॅन डर ड्युसेन यांच्या १३१ धावांच्या आक्रमक भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन संघाने नवी दिल्लीत रंगलेल्या पहिल्या टी-२० लढतीत भारतावर देदीप्यमान विजय साकारला आणि पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये उद्या कटक येथे दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल जिंकण्याची करामत केली असून त्यामुळे त्याच्याकडे भारताचा सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या प्रकारातील भविष्याचा कर्णधार म्हणून बघितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर या मालिकेत भारताचे नेतृत्व करीत असलेल्या रिषभ पंतचे नेतृत्व पणास लागले आहे.

India vs South Africa 2nd T20I
IND vs SA : कटकचा इतिहास काय सांगतो?

भारतीय संघाने पहिल्या लढतीत फलंदाजी विभागात ठसा उमटवला. इशान किशन (७६ धावा), ऋतुराज गायकवाड (२३), श्रेयस अय्यर (३६), रिषभ पंत (२९) व हार्दीक पंड्या (नाबाद ३१) या फलंदाजांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने २११ धावा उभारल्या. ऋतुराजकडून आणखी मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. तसेच वेगवान गोलंदाजांच्या आखूड टप्प्याच्या चेंडूंना चाचपडत खेळणाऱ्या श्रेयसच्या फलंदाजीत आणखी सुधारणा आवश्‍यक आहे. रिषभ व हार्दिक यांना मधल्या फळीत पुन्हा एकदा आपली चमक दाखवावी लागणार आहे. हार्दिकने आयपीएलमधील फॉर्म पहिल्या लढतीतही कायम राखला असला तरी गोलंदाजीत त्याला धमक दाखवता आली नाही.

India vs South Africa 2nd T20I
बटलर टॉलीवूडच्या किच्च्यावर फिदा, बॅटवर साईन करत दिलं खास गिफ्ट

अर्शदीप किंवा उमरानपैकी एकाला संधी?

भारतीय गोलंदाजांच्या अपयशामुळे आम्ही हरलो, असे स्पष्ट मत रिषभने पहिल्या लढतीनंतर व्यक्त केले. दुसऱ्या लढतीतही टीम इंडियासाठी गोलंदाजी हा चिंतेचा विषय असणार आहे. भुवनेश्‍वर कुमार (४ षटकांत ४३ धावा) याला प्रतिमेला साजेशी गोलंदाजी अद्याप करता आलेली नाही. अवेश खान (४ षटकांत ३५ धावा) आणि हर्षल पटेल (४ षटकांत ४३ धावा) या गोलंदाजांना सपाटून मार खावा लागला. ‘आयपीएल’च्या नुकत्याच पार पडलेल्या मोसमात २७ फलंदाज बाद करणाऱ्या युजवेंद्र चहलला ४ षटके गोलंदाजी का दिली नाही, या प्रश्‍नाचे उत्तर रिषभच देऊ शकेल. अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक या वेगवान गोलंदाजांपैकी एकाला उद्याच्या लढतीत संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

India vs South Africa 2nd T20I
पहाटे पाच वाजता उठायचो अन्... पांड्याने सांगितली मनातली गोष्ट

आयपीएल स्टार्सची देशासाठी चमक

‘आयपीएल’च्या मोसमात चमकणारे खेळाडू आता आपल्या देशासाठी अर्थातच दक्षिण आफ्रिकेसाठी अव्वल दर्जाची कामगिरी करत आहेत. डेव्हिड मिलर (४८१ धावा), क्विंटॉन डी कॉक (५०८ धावा) यांनी आयपीएलचा मोसम गाजवला. पहिल्या लढतीत मिलरने सामन्याला कलाटणी देणारी खेळी साकारली. ड्युसेनने त्याच्या तोडीस तोड खेळ केला. मिलर, ड्युसेन व डी कॉक या त्रिमूर्तीवर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी अवलंबून असेल. तसेच कागिसो रबाडा व ॲनरिक नॉर्किया या वेगवान गोलंदाजांना भारतीय फलंदाजांना बांधून ठेवावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com