
SA vs IND 3rd ODI : सामन्यात काय घडलं अन् कुठं गणित बिघडलं
South Africa vs India 3rd ODI : केपटाऊनच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यातबी दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाला पराभूत करुन दाखवलं. पहिल्यांदा बॅटिंग करताना यजमानांनी टीम इंडियासमोर 288 धावांचं लक्ष्य ठेवलं होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 283 धावांत आटोपला. आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकनं सर्वाधिक 124 धावांची खेळी केली होती. त्याने 130 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार आणि 2 षटकार खेचले. रस्सी व्हॅन डर दुसेन याने अर्धशतकी खेळी करुन क्विंटनला सुरेख साथ दिली. त्याने 59 चेंडूत 52 धावा केल्या. या दोघांशिवाय डेविड मिलरनं 39 चेंडूत 39 धावांची खेळी केली. भारताकडून प्रसिद्ध कृष्णानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. बुमराह दीपक चाहर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर युजवेंद्र चहलला एक विकेट मिळाली.
भारतीय संघाची सुरुवात खराब झाल्यानंतर कोहली धवन जोडीनं संघाचा डाव सावरला. त्यानंतर तळाच्या फलंदाजीत दीपक चाहरने भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण दीपक चाहर बाद झाला आणि सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं वळला. भारतीय संघावर व्हाईटची नामुष्की ओढावली.
283-10 : युजवेंद्र चहल बाद, टीम इंडियाने चार धावांनी गमावला सामना
281-9 : जसप्रित बुमराहच्या रुपात आणखी एक धक्का, सामना पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं वळला
278-8 : विजयाची आस निर्माण करणारा दीपक चाहर चुकीचा फटका मारून तंबूत परतला, भारतीय संघ पुन्हा अडचणीत
223-7 : लुंगी एनिग्डीनं जयंत यादवच्या रुपात टीम इंडियाला दिला सातवा धक्का
210-6 : सूर्यकुमार यादव मॅच फिनिशिंग खेळी करण्यात अपयशी, पेट्रोरियसच्या गोलंदाजीवर 39 धावांवर झाला झेलबाद
195-5 : श्रेयस अय्यर माघारी, मागलानं 26 धावांवर दाखवला तंबूचा रस्ता
156-4 : अर्धशतकानंतर विराट कोहली माघारी, त्याने 84 चेंडूत 65 धावा केल्या
118-3 : रिषभ पंतचा भोपळा; फेहलुकवायोनं घेतली विकेट
116-2 : टीम इंडियाला दुसरा धक्का, फेहलुकवायोनं धवनला दाखवला तंबूचा रस्ता, त्याने 73 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 61 केल्या
धवनचं दमदार अर्धशतक!
धवन आणि कोहली जोडी जमली, दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली पूर्ण
18-1 : लुंगी एनिग्डीनं टीम इंडियाला दिला मोठा धक्का, कर्णधार लोकेश राहुल अवघ्या 9 धावांची भर घालून तंबूत
287-10 : मगलाच्या रुपात प्रसिद्ध कृष्णानं घेतली मॅचमधील तिसरी विकेट, दक्षिण आफ्रिकेचा संघ 287 धावांवर ऑल आउट
287-9 : फटकेबाजी करण्याच्या नादात मिलर तंबूत, प्रसिद्ध कृष्णाला मिळालं यश
आफ्रिकेचा 287 धावांत ऑल आउट; प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात सर्वाधिक तीन विकेट
282-8 : बुमराहला आणखी एक यश, केशव महाराज 6 धावा करुन माघारी
272-7 : प्रसिद्ध कृष्णाला मिळालं यश; प्रेट्रोरियसला 20 धावांवर केलं चालते
228-6 : फेहलकवायोच्या रुपात दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का, श्रेयस अय्यरनं डायरेक्ट थ्रो करत 4 धावांवर धाडले तंबूत
218-5 : रस्सी व्हॅन डर दुसेनच्या रुपात युजीला पहिलं यश, श्रेयस अय्यरनं जबरदस्त कॅच घेत दुसेनला 52 धावांवर धाडले माघारी
214-4 : बुमराहनं आफ्रिकेला दिला चौथा धक्का, क्विंटन डिकॉक 130 चेंडूत 124 धावा करुन तंबूत परतला
रस्सी व्हॅन डर दुसेन याच्या कामगिरीतील सातत्य कायम, आणखी एक दमदार अर्धशतक
क्विंटन डिकॉक आणि व्हॅन डर दुसेन जोडी जमली, सलामीवीराचे शतक तर दुसेन अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करतोय
क्विंटन डिकॉकच आणखी एक अर्धशतक
70-3 : मार्करमच्या रुपात दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, दिपक चाहरने त्याला ऋतूराज गायकवाडकरवी केलं झेलबाद
34-2 : केएल राहुलची अप्रतिम फिल्डिंग, डायरेक्ट हिटवर टेम्बा बवुमाला 8 धावांवर धाडले तंबूत
8-1 : दीपक चाहरनं सलामी जोडी फोडली, जानेमन मलानला पंतकरवी केलं झेलबाद
क्विंटन डिकॉक अन् जानेमन मलान यांनी केली आफ्रिकेच्या डावाची सुरुवात

सुर्यकुमारसह जयंत यादव, दीपक चाहर आणि प्रसिद्ध कृष्णाला संधी
भारतीय संघाचा कर्णधार लोकेश राहुलनं टॉस जिंकून घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय
South Africa (Playing XI): जानेमन मलान (Janneman Malan), क्विंटन डिकॉक (Quinton de Kock(w)), टेम्बा बवुमा (Temba Bavuma(c)), मार्करम (Aiden Markram), व्हॅन डर दुसेन (Rassie van der Dussen), डेविल मिलर (David Miller), फेहलुकवायो (Andile Phehlukwayo), केशव महाराजा (Keshav Maharaj), ड्वेन पेट्रियएस (Dwaine Pretorius), लुंगी एनिग्डी (Lungi Ngidi), मगला (Sisanda Magala).
India (Playing XI): लोकेश राहुल ( KL Rahul(c)), शिखर धवन (Shikhar Dhawan), विराट कोहली (Virat Kohli), रिषभ पंत (Rishabh Pant(w)), सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), जयंत यादव (Jayant Yadav), प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna), दीपक चाहर (Deepak Chahar), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)
Web Title: South Africa Vs India 3rd Odi Live Cricket Score Suryakumar Yadav Jayant Yadav Deepak Chahar Given A Chance Record Final Result
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..