हशिम आमलाची क्रिकेटमधून निवृत्ती 

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज हशिम आमला याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचा निर्णय घेतला.

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज हशिम आमला याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचा निर्णय घेतला. 

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतही त्याचा दक्षिण आफ्रिका संघात समवोश होता. आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो आता केवळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार आहे. आमलाने 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून 349 सामने खेळले असून, यात 18 हजारहून अधिक धावा केल्या. यात 55 शतके आणि 88 अर्धशतकांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करणारा आमला एकमेव फलंदाज आहे. 

निवृत्तीची घोषणा करताना आमला म्हणाला,""दक्षिण आफ्रिकेकडून खेळायला मिळाला हा मी माझा गौरव मानतो. पंधरावर्षाच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिले. खूप काही शिकायला मिळाले. मला साथ देणाऱ्या सर्व सहकारी, कुटंबिय आणि चाहत्यांचा आभारी आहे. यांच्यामुळेच मी ही मजल मारू शकलो.'' 

दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे आभार मानण्यासही तो विसरला नाही. तो म्हणाला, ""त्यांनी मला दक्षिण आफ्रिकेसाठी खेळण्यास निवडले हेच माझ्यासाठी खूप होते. त्यांनी संधी दिली नसती, तर मी खेळूच शकलो नसतो. माझ्या यशा अपयशात ते कायम माझ्या पाठिशी उभे राहिले.'' 

आमलाची कारकिर्द 
124 कसोटी 
215 डाव 
9282 धावा 
28 शतके 
41 अर्धशतके 
311 सर्वोच्च 

-------------- 
181 वन-डे 
178 डाव 
8113 धावा 
27 शतके 
39 अर्धशतके 
159 सर्वोच्च 

-------------- 
44 टी 20 
44 डाव 
967 धावा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South African cricketer Hashim Amla Retires From All Formats Of Cricket